महाराष्ट्र

Gadchiroli Rice Scam : नाना पटोलेंच्या राजकीय हंडीत तांदळाचा वाफा

Nana Patole : चिल्लर विषयांकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही

Post View : 28

Author

गडचिरोली तांदूळ घोटाळ्यात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी नाना पटोले यांच्याकडे संशयानं पाहणं सुरू केलं आहे.

संपूर्ण देशभरात एकीकडे होळीचा उत्सव सुरु असतांना दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात गडचिरोली जिल्ह्यातील तांदळावरून मोठी राजकीय धुळवड सुरू आहे. होळीच्या रंगांसारखा हा मुद्दा आता केवळ स्थानिक राहिलेला नाही, तर संपूर्ण राज्यात तो उधळला जात आहे. गडचिरोली जिल्ह्यातील तांदूळ खरेदी आणि त्यातील अनियमितता यावरून जोरदार राजकीय रंग लागले आहे. काही नेत्यांचे एजंट राइस मिल मालकांकडून ‘एलएक्यु’चा धाक दाखवत खंडणी वसूल करत असल्याचा आरोप आहे.

विधान परिषदेत या मुद्द्यावर लक्षवेधी मांडण्यात आली. त्यानंतर राजकीय वातावरण आणखी तापत आहे. विधान सभेतही यावर चर्चा झाली आहे. गडचिरोलीमधील तांदळाचा मुद्दा विधान सभेत गाजला. त्यावर उघड भूमिका घेणारे दोनच आमदार होते. पहिले आमदार भाजपचे सुधीर मुनगंटीवार आणि दुसरे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले. त्यामुळे अनेकांनी एलएक्युच्या मुद्द्यावरून नानांकडे संशयाने पाहणे सुरू केले आहे. काँग्रेसचे विरोधक आणि काँग्रेसमधील नानांचे विरोधक दोघेही कंबर कसून मैदानात उतरले आहेत.

Mahyuti : फडणवीसांच्या ट्रॅफिक सिग्नलसमोर शिंदेंची बस ‘नो एन्ट्री’ मध्ये अडकली

राजकीय धुळवड

नाना पटोलेंच्या नावाशी हा मुद्दा जोडला जात असल्याने विरोधक त्यांच्यावर जोरदार टीका करीत आहेत. प्रश्न उपस्थित केला जात आहे की, वसुली करणाऱ्या एजंटांचे धागेदोरे नेमके कोणाशी जोडलेले आहेत याचा उलगडा झाला पाहिजे असंच सगळ्यांना वाटत आहे. आमदार नाना पटोले यांनी या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. विरोधकांवर त्यांनी पलटवार केला आहे. पटोले म्हणाले, आपण चिल्लर मुद्द्यांकडे लक्ष देत नाही. विधिमंडळात गाजत असलेल्या या मुद्द्यावरून सध्या महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चांगलीच धुळवड सुरू झाली आहे. पूर्व विदर्भात गेल्या अनेक वर्षांपासून धान भरडाईमध्ये गैरप्रकाराचा आरोप होत आहे. आता पुन्हा या मुद्द्यावर नव्याने वादळी चर्चा सुरू झाली आहे. गडचिरोलीतील राइस मिल मालकांना एलएक्युचा धाक दाखवत खंडणी वसुली करणारे एजन्ट आणि संबंधित नेते कोण, याचा उलगडा होणे आता नितांत गरजेचे झाले आहे.

अधिवेशनात प्रश्न लावण्यासाठी, लक्षवेधी लावण्यासाठी नेत्यांच्या एंजट्सकडून व्यवहार होत असल्याचा आरोप झाल्यामुळं या प्रकरणाला गंभीर वळण लागलं आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील ऑडिओ, व्हिडीओ क्लिपदेखील मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्या आहेत. त्यामुळे हे प्रकरण आता कोणावर शेकणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिपमध्ये दिसणारे वसुली एजन्ट कोणत्या नेत्याचे आहेत, हे अद्याप अस्पष्ट आहे.

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित यांनी अनेक वर्ष सकाळ माध्यम समूहासोबत रिपोर्टर म्हणून काम केलं. साम टिव्हीचे ते रिपोर्टर होते. याशिवाय सरकारनामा या सकाळ समूहाच्या राजकीय वेब पोर्टलचे प्रतिनिधी देखील होते.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!