महाराष्ट्र

Parinay Fuke : गणरायाच्या आशीर्वादाने भाजपला मिळाले खरे ‘विघ्नहर्ता’

Corporation Election : वैनगंगेच्या तीरावर भाजपचा झेंडा फडकणार का?

Author

भंडारा-गोंदिया जिल्ह्यात माजी मंत्री मांदार डॉ. परिणय फुके यांच्या नेतृत्वामुळे भाजपचा झेंडा सतत फडकत आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकीतही तेच भाजपचे खरे विघ्नहर्ता ठरणार का यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

महाराष्ट्राचा आत्मा असलेला गणेशोत्सव यंदाही उत्साह आणि भक्तीच्या रंगात रंगला आहे. प्रत्येक घर, गल्ली, आणि मंडळात गणरायाचे आगमन ‘गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया’ या गजराने झाले आहे. बाप्पाच्या स्वागतात भक्तीचा उत्साह तर आहेच, पण यंदा या उत्सवात राजकीय रंगसंगतीही मिसळली आहे. याला कारणही तसेच ठरले आहे.  राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक होणार आहे. गणपती बाप्पा विघ्नहर्ता म्हणून सर्वांचे लाडके, पण यंदा राजकीय नेतेही बाप्पाच्या चरणी साकडं घालताना दिसत आहेत. ‘सर्व विघ्न दूर कर, निवडणुकीत यश मिळू दे’ अशी प्रार्थना करताना प्रत्येक पक्ष गणेश मंडळांना भेटी देत आहे. 

पूर्व विदर्भाचे राजकारण पाहता भाजपचा विघ्नहर्ता कोण ठरेल तर एक नाव नेहमी आघाडीवर येतो. वैनगंगेच्या तीरावर भाजपचा झेंडा सातत्याने फडकत आहे. यामागे आहे, एका धडाडीच्या नेत्याची मेहनत. ते म्हणजे भाजपचे विद्यमान नेते तथा माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके. डॉ. फुके यांनी आपल्या सातत्यपूर्ण कार्याने आणि शेतकऱ्यांसाठीच्या लढ्याने पूर्व विदर्भात भाजपला नवी उंची दिली आहे. डॉ. परिणय फुके यांचे नाव घेतले की एक आक्रमक, जनसामान्यांसाठी लढणारा नेता डोळ्यांसमोर येतो.

Maharashtra : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक

भाजपचा विश्वासू चेहरा

विधान परिषदेत त्यांचा आक्रमक पवित्रा, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना शासन दरबारी वाचा फोडण्याची कला आणि सहकार क्षेत्रातील त्यांचा दबदबा यामुळे ते पूर्व विदर्भात भाजपचे ‘विघ्नहर्ता’ ठरू शकतात याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे, ते महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे अध्यक्षही आहेत. बुद्धिबळाच्या पटलावर ज्याप्रकारे ते विरोधकांना चेकमेट करतात, तशीच रणनीती ते राजकारणातही वापरतात. कोणता प्यादा कधी हलवायचा, वजीर कसा फिरवायचा, याची खेळी त्यांना बरोबर अवगत आहे. लोकसभा निवडणुकीचा अपवाद वगळता, विधानसभा, दूध संघ, सहकार क्षेत्र, शेतकरी संघटना किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भाजप आणि महायुतीचा झेंडा फडकवण्यात डॉ. फुके यांचा सिंहाचा वाटा आहे.

यंदाच्या महापालिका निवडणुकीतही भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात त्यांच्याच रणनीतीवर सर्वांचे डोळे लागले आहेत. प्रभाग रचनेमुळे निर्माण झालेल्या गोंधळातही भाजपला यश मिळवून देण्याची जबाबदारी डॉ. फुके यांच्यावर आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. प्रत्येक गल्लीत, प्रत्येक मंडळात कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. पण भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील राजकीय चित्र स्पष्ट आहे. डॉ. परिणय फुके हेच भाजप आणि महायुतीचे तारणहार ठरतील. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने यापूर्वी अनेक यश मिळवले आहे. यंदाही त्याच जोमाने ते मैदानात उतरले आहेत.

Jayashree Shelke : बुलढाणा पालिकेच्या प्रभाग रचनेत घोटाळ्याचा गंध

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!