
उल्लेखनीय कामगिरीसाठी मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापक धर्मवीर मीणा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांमध्ये 12 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रात राज्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आलेत. मुंबई विभागातील तीन, भुसावळ विभागातील चार, सोलापूर विभागातील दोन, पुणे विभागातील दोन आणि नागपूर विभागामधील एकाला जणांना सुरक्षा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कर्तव्यादरम्यान सतर्कता, अनुचित घटना रोखण्यात यश आणि रेल्वे वाहतुकीत सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी त्यांनी योगदान दिलं.
मुंबई विभागाता डिसेंबर महिन्यात मालगाडीची जीडीआर तपासणी करण्यात आली. पनवेल, मुंबई येथील ट्रेन मॅनेजर धर्मराज सिंह यांना एका वॅगनचा एक्सल अॅडॉप्टर एक्सल ट्रॉलीपासून वेगळा झाल्याचे लक्षात आले. ही बाब तातडीने सर्व संबंधितांना कळवण्यात आली. त्यामुळं अपघात टळला. सीएसएमटी, मुंबई येथील ट्रेन मॅनेजर रामदास चौधरी यांना मध्यरात्री ठाण्यातील रनिंग रूममध्ये अचानक काहीतरी जळत असल्याच्या वास आला. त्यावेळी आराम करणाऱ्या एका मोटरमनच्या बॅगेला आणि शर्टला आग लागली होती. त्यांनी ताबडतोब त्याला जागे केले. इतरांना सूचना दिली. अग्निशामक यंत्रांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली.

अनेक Accident टळले
नोव्हेंबर 2024 मध्ये एका मालगाडीची नियमित तपासणी सुरू होती. त्यावेही इगतपुरीचे फिटर सचिन जगदाळे यांना एका वॅगनच्या एक्सल बॉक्समधील बेअरिंग कप तुटल्याचे लक्षात आले. तातडीनं त्याची दुरूस्ती करण्यात आली. त्यामुळं संभाव्य गंभीर अपघात टळला. भुसावळचे मुख्य लोको निरीक्षक आर. एन. घाटे यांनीही अशीच सतर्कता दाखविली. गोंदिया-कोल्हापूर एक्सप्रेसच्या फूटप्लेटिंग तपासणीदरम्यान त्यांना ओएचई तुटलेल्या अवस्थेत आढळले. त्यांनी ट्रेन थांबविल्याने प्रवासी सुरक्षित राहिले. इंजिनच्या लोको पायलटला शेगावजवळ ही गाडी थांबविण्यात आली.
ऑक्टोबर 2024 मध्ये भुसावळ येथील सहाय्यक लोको पायलट अनिल कुमार गुप्ता यांच्या सतर्कतेमुळे ज्ञानेश्वरी एक्सप्रेसचा अपघात टळला. त्यांना इंजिनसमोरील कोचमधून धूर येत असल्याचे दिसले. त्यांनी ताबडतोब लोको पायलटला सतर्क केले. ट्रेन थांबवण्यात आली. अग्निशामक यंत्रांच्या मदतीने आग विझवण्यात आली. बारकाईने तपासणी केल्यावर असे आढळून आले की ब्रेक बाइंडिंगमुळे आग लागली होती. पेट्रोलिंग ड्युटीदरम्यान बोदवड, भुसावळ येथील ट्रॅक मेंटेनर अमरेश कुमार यांना रेल्वे रुळाला तडे गेल्याचे लक्षात आले. त्यांनी ताबडतोब ट्रॅक सुरक्षित केला.
भुसावळच्या सातमा येथील तंत्रज्ञ शालिनी विजय या मालगाडीची तपासणी करीत होत्या. त्यावेळी त्यांना एका वॅगनच्या बॉलस्टरवर भेगा दिसल्या. नियमित तपासणीत या भेगा शोधणे कठीण असते. त्यांनी तातडीने सर्व संबंधितांना माहिती दिली. त्यांच्या काळजीपूर्वक निरीक्षणामुळे, त्वरित कारवाईमुळे संभाव्य अपघात टळला. सोलापूर विभागातील सांगोला येथील तंत्रज्ञ बनवारी लाल यांनीही सतर्कता दाखविली. धालगाव-लंगरपेट विभागाच्या देखभालीचे काम सुरू होते. त्यावेळी त्यांना नऊ टन इन्सुलेटरवर दोन ठिकाणी भेगा आढळल्या.
Solapur मधील कर्मचारीही सतर्क
सोलापूर विभागातील दुधनी येथील ट्रॅकमन येल्लाप्पा फुलमाळी यांनी कीमन म्हणून कर्तव्यावर असताना चोखपणे काम केलं. एका मालगाडीच्या वॅगनवर ब्रेक बाइंडिंग झाल्याचे त्यांनी पाहिले. त्यांनी तातडीने सर्व संबंधितांना माहिती दिली. पुणे विभागीतल उरुळी येथील ट्रॅक मेंटेनर अनुप कुमार यादव हे गेट ड्युटीवर होते. त्यांना अमरावती-पुणे एक्सप्रेसच्या एका डब्यात गरम एक्सल दिसला. त्यांनी तातडीने सर्व संबंधितांना माहिती दिली. यावर वेळीच उपाय करण्यात आला.
पुण्याच्या तळेगाव येथील ट्रॅक मेंटेनर कुलदीप मौर्य यांना एका मालगाडीच्या वॅगनवर ब्रेक बाइंडिंग झाल्याचे आढळले. नागपूर विभागातील ट्रेन मॅनेजरनेही अशीच सतर्कता दाखविली. ट्रेन रोशनी अरुणराव मालगाडीच्या ड्युटीवर होता. त्यांना विरुद्ध दिशेने जाणाऱ्या मालगाडीच्या वॅगनला एक भाग लटकलेला दिसला. याबाबत त्यांनी ताबडतोब दुसऱ्या मालगाडीच्या मॅनेजरला माहिती दिली. ट्रेन थांबवून तपासणी करण्यात आली. त्यामुळं अपघात टळला.