महाराष्ट्र

Prashant Padole : हरित संकल्पासाठी खासदाराने गाठली दिल्ली

East Vidarbha : जंगल, पाणी आणि रोजगारासाठी ग्रीन हब

Post View : 41

Author

काँग्रेस खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेत गोंदिया-भंडारा परिसराच्या पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासासाठी महत्वाच्या प्रस्तावांची मांडणी केली.

पूर्व विदर्भ म्हटले की, डोळ्यासमोर येतात हिरवीगार जंगले, जैवविविधतेचा खजिना आणि आदिवासी संस्कृतीचा गंध. या सौंदर्याला सजवण्यासाठी आणि संरक्षित करण्यासाठी गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी पुन्हा एकदा आपली आक्रमक पावले पुढे टाकली आहेत. 22 ऑगस्ट 2025 रोजी त्यांनी थेट नवी दिल्ली गाठली आणि केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्या मंत्रालयाच्या दारावर ठणठणाट केला. त्यांच्या हातात होता एक दूरदर्शी प्रस्ताव, ज्यामध्ये पूर्व विदर्भाच्या समतोल विकासाचा आणि पर्यावरण संरक्षणाचा सुंदर संगम होता. 

डॉ. प्रशांत पडोळे यांचा हा लढा केवळ कागदोपत्री मागण्या नाहीत, तर त्यांच्या मनात दडलेलं पूर्व विदर्भाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न आहे. त्यांनी मांडलेल्या प्रस्तावांमध्ये पर्यावरण आणि विकास यांचा सुंदर समन्वय आहे. ज्यामुळे गोंदिया-भंडारा हा केवळ एक मतदारसंघ न राहता, देशासाठी एक प्रेरणादायी मॉडेल बनण्याची क्षमता आहे. त्यांनी मंत्र्यांसमोर ठेवलेल्या मागण्या म्हणजे जणू हरित क्रांतीचा पाया आहे. जिथे निसर्ग आणि माणूस एकमेकांना सांभाळत पुढे जातील. डॉ. प्रशांत पडोळे यांनी मांडलेल्या पाच सूचना म्हणजे पूर्व विदर्भाच्या नैसर्गिक संपत्तीला नवं आयाम देणारी खूणगाठ आहे.

Lohit Matani : देवा भाऊंच्या गावात डीसीपींनी ओढली नो-पार्किंगची रेघ

स्थानिक रोजगार संधी

पडोळे यांनी प्रस्तावित केलेले जैवविविधता उद्यान आणि पर्यावरण अभ्यास केंद्र हे केवळ संशोधनाचे केंद्र नसून, तरुणांना पर्यावरण संवर्धनाचे शिक्षण देणारी पाठशाला असेल. यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी तर मिळतीलच, पण विदर्भाचे नाव राष्ट्रीय स्तरावर झळकेल. त्याचबरोबर, पर्यावरण-पर्यटनाला प्रोत्साहन देण्याचा त्यांचा विचार स्थानिक तरुणांना स्वावलंबी बनवेल आणि गोंदिया-भंडाऱ्याच्या जंगलांचे सौंदर्य जगासमोर आणेल. कॅम्पा निधीतून वनीकरण आणि जलसंधारण प्रकल्प हा प्रस्ताव पाणी आणि हिरवळ यांचा मेळ घालणारा आहे. या प्रकल्पामुळे पाण्याची टंचाई कमी होईल आणि जंगलांचा विस्तार होईल. याशिवाय, वन हक्क कायदा 2006 वर्षाची प्रभावी अंमलबजावणी करून आदिवासी बांधवांच्या हक्कांना प्राधान्य देण्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे.

हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी त्यांनी ठोस पावलं उचलण्याची गरज अधोरेखित केली, ज्यामुळे पूर्व विदर्भ हवामान बदलाशी लढण्यात अग्रेसर ठरेल.  केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी डॉ. प्रशांत पडोळे यांच्या या दूरदर्शी दृष्टिकोनाचे कौतुक केले आणि पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले. हा केवळ शब्दांचा खेळ नाही, तर पूर्व विदर्भाला नवी ओळख देण्याची सुरुवात आहे. डॉ. प्रशांत पडोळे यांचा हा लढा म्हणजे एका खासदाराचे कर्तव्य नाही, तर एका स्वप्नद्रष्ट्याचा निश्चय आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे गोंदिया-भंडारा हे केवळ नकाशावरचं नाव न राहता, पर्यावरण आणि विकासाच्या समतोलाचं प्रतीक बनेल. त्यांच्या या पावलांमुळे पूर्व विदर्भाचा हरित वारसा आणि आदिवासी समाजाचं उत्थान हातात हात घालून पुढे जाईल.

Nana Patole : संजयकुमार ट्विट प्रकरण आणि आयोगावरील आरोपांचा गोंधळ

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित यांनी अनेक वर्ष सकाळ माध्यम समूहासोबत रिपोर्टर म्हणून काम केलं. साम टिव्हीचे ते रिपोर्टर होते. याशिवाय सरकारनामा या सकाळ समूहाच्या राजकीय वेब पोर्टलचे प्रतिनिधी देखील होते.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!