महाराष्ट्र

Charan Waghmare : पडळकरांच्या बॅनरवर जोड्यांची बरसात

Gopichand Padalkar : कारवाई नाही तर तोंडाला फासणार काळं

Author

भाजपचे गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्या विरुद्ध केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच वादळी वारे वाहत असतात. नेते एकमेकांवर ताशेरे ओढतात. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतात, पण कधीकधी हे वाद इतके तीव्र होतात की संपूर्ण राज्याचे वातावरण तापून जाते. अशीच एक घटना सध्या चर्चेत आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. हे वक्तव्य इतके खालच्या पातळीचे होते की, त्याचे पडसाद आता आंदोलनांच्या रूपाने उमटत आहेत. ठिकठिकाणी निषेध मोर्चे काढले जात आहेत. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.

पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यात तर हे वादळ आणखी तीव्र झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने माजी आमदार चरण वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली एक मोठा निषेध मोर्चा काढला. या मोर्चात कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकरांविरोधात जोरदार घोषणा दिल्या. त्यांच्या बॅनरवर जोड्याने मारहाण करून निषेध व्यक्त केला. गोपीचंद पडळकर मुर्दाबाद अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. या वक्तव्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली आहे. अन्यथा, कार्यकर्ते पडळकरांच्या तोंडाला काळे फासण्याची धमकीही दिली आहे. गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांचा एकेरी उल्लेख करत, त्यांच्या वडिलांचाही अपमान केला होता.

Ajit Pawar : चांद्यापासून बांद्यापर्यंत संघटना बळकटीकरणाचे ध्येय

मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप

अरे जयंत पाटला, तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही. माझ्यात कार्यक्रम करायची ती धमक आहे. तुझ्यासारखी ती अवलाद नाही. एवढ्या खालच्या लेव्हलला? आता माझा दांडीयाचा कार्यक्रम आहे. ये बघायला. तुझे डोळे दिपून जातील कार्यक्रम बघून,’ अशी तिखट टीका त्यांनी केली होती. हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाले. ज्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा राग उफाळला. जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहे. भारतीय जनता पक्षाचे ‘मंगळसूत्र चोर’ आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील हा राजाराम बापूची अवलाद होऊ शकत नाही, असे वक्तव्य केले. त्याच्या निषेधार्थ शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पूर्ण महाराष्ट्रभर या घटनेचा निषेध केला पाहिजे, असे आव्हान दिले.

आव्हानाला साथ देत आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलो आहोत असं चरण वाघमारे यांनी म्हंटले.   या प्रकरणात आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हस्तक्षेप केला आहे. गोपीचंद पडळकर यांनी नुकतेच प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, मुख्यमंत्र्यांचा त्यांना फोन आला होता. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मला फोन आला होता. त्यांनी मला अशी वक्तव्य करू नका, अशी सक्त ताकीद दिली आहे. मी त्यांच्या सूचनेचे पालन करेन. मला मुख्यमंत्र्यांनी ज्या सूचना दिल्या आहेत, त्यांचं मी यापुढे पालन करणार आहे, असे पडळकर म्हणाले. या घटनेने भाजप अंतर्गतही चर्चा सुरू झाली आहे. कारण पक्षाच्या नेत्यांना अशा वक्तव्यांमुळे पक्षाची प्रतिमा डागाळण्याची भीती आहे.

Bachchu Kadu : मर किसान, मर जवान हा भाजपचा नारा

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!