महाराष्ट्र

Prakash Ambedkar : कबरीचा मुद्दा अयोध्यासारखा पेटणार

Vanchit Bahujan Aghadi : प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली भीती

Author

महाराष्ट्र मधील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली आहे. कोणतेही कारण नसताना सध्या औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा गाजत आहे. यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी चिंता व्यक्त केली आहे.

औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा सध्या विनाकारण चर्चिला जात आहे. कोणतेही कारण नसताना या विषयावर राज्यभरामध्ये आंदोलन करण्यात येत आहे. नागपूर शहरांमध्ये या विषयावरून दंगल उसळली आहे. यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी चिंता व्यक्त केली. अयोध्येतील राम जन्मभूमी स्थळाप्रमाणे औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा चिघळवत ठेवण्यात येईल, अशी भीती ज्यांनी व्यक्त केली आहे.

देशामध्ये सध्या अनेक महत्त्वाचे विषय आहेत. परंतु गेल्या काही दिवसांपासून जातीधर्मामध्ये तणाव निर्माण करण्यात येत आहे. अनेक मुद्द्यांवर नेते आक्रमकपणे बोलत आहेत. त्यामुळे समाजातील वेगवेगळ्या घटकांमध्ये फूट पडत असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. केंद्र आणि राज्य सरकार महत्त्वाच्या विषयांवरून लोकांचे लक्ष भरकटवण्यासाठी असा प्रकार करत असल्याचेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Parinay Fuke : सोशल मीडियावरील चमकोबाजांना चाप

सखोल चौकशी गरजेची

औरंगजेबाच्या कबरीबाबत आतापर्यंत कुठेही चर्चा नव्हती. परंतु अचानक पणे हा मुद्दा इतका गंभीर कसा करण्यात आला, असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी केला. औरंगजेबाच्या कबरीसह असे काही मुद्दे आयोध्या सारखे चिघळले जाऊ शकतात, अशी भीतीही प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. सरकारने सगळ्यात आधी जाती धर्मांमध्ये द्वेष पसरवणाऱ्या लोकांना आवर घातली पाहिजे. आपल्या सर्व नेत्यांना प्रक्षोभक वक्तव्य करू नका असा इशारा दिला पाहिजे. त्यानंतरही तेढ निर्माण करणारी वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना बाजूला केले पाहिजे, अशी मागणी देखील प्रकाश आंबेडकर यांनी केली.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये दंगली घडू शकतात, अशी भीती प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वी व्यक्त केली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. मात्र आपण या संदर्भात यापूर्वीच संकेत दिले होते. सामान्य जनतेने अशा कोणत्याही प्रक्षोभक विधानांकडे लक्ष देऊ नये, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. जनतेने सरकारला विकासाच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी बाध्य केले पाहिजे. महाराष्ट्र मध्ये रोजगार, शिक्षण, मूलभूत सुविधा असे अनेक मुद्दे आहेत. त्यावर चर्चा होणे महत्त्वाचे आहे. जातीयवादाचे विष पसरवल्यामुळे कोणाचाही फायदा होणार नाही, असे देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले. समाजाने आपल्याला काय हवे आहे, विकास किंवा असले प्रकार हे ठरवावे असे देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!