महाराष्ट्र

Harshawardhan Sapkal : भारत जोडो, डरो मत हिच खरी दिशा

Congress : आम्ही एकता साधणारे, फूट पाडणारे नाही

Post View : 25

Author

देशात दडपशाही वाढत असतानाच हर्षवर्धन सपकाळ यांनी भारत जोडोचा झेंडा पुन्हा उंचावला आहे.

देशात लोकशाही आणि संविधानाला पायदळी तुडवत सत्तेचा वापर भीती आणि दडपशाहीसाठी केला जातोय. सध्या प्रत्येक घटक भयग्रस्त आहे. अल्पसंख्याक असो, शेतकरी असो, बेरोजगार तरुण असो, गृहिणी असो किंवा महिला सर्वांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. अशी परखड टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. या दडपशाहीच्या अंधारातून लोकशाहीची मशाल पेटवणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भारत जोडोचा झेंडा पुन्हा एकदा उंचावला आहे.

राहुल गांधींच्या डरो मत या घोषवाक्याला आचरणात आणत, देशातील एकता आणि अखंडतेसाठी संघर्षाची नवी दिशा त्यांनी पुण्यातील मायनॉरीटी युथ पार्लमेंट कार्यक्रमात दिली. सपकाळ यांनी स्पष्टपणे सांगितले की, आज अल्पसंख्यांक, महिलावर्ग, शेतकरी, तरुण, गृहिणी, बहुजन समाज, सगळेच भीतीच्या सावटाखाली जगत आहेत. संविधानाचे मूल्य आणि समाजातील विविध घटकांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. घराबाहेर पडताना महिलेला सुरक्षिततेची खात्री नाही. बेरोजगारीने तरुणांचा आत्मविश्वास गमावला आहे.

Vijay Wadettiwar : तिसरी भाषा लादण्याचा प्रयत्न नको

 

सुसंवादाची भूमिका

महागाईने कुटुंबांचे अर्थचक्र कोलमडले आहे. देशात भय निर्माण करून सत्तेचा माज दाखवणाऱ्या प्रवृत्तींचा त्यांनी तीव्र शब्दांत समाचार घेतला.हर्षवर्धन सपकाळ यांनी ठामपणे म्हटले की, आज अल्पसंख्यांकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर अपशब्द बोलणाऱ्यांवर कारवाई न होणे, ही केवळ शिवभक्तांवर अन्याय नव्हे तर महाराष्ट्राच्या अस्मितेवर आघात आहे. त्यामुळे बहुसंख्य समाजानेही अल्पसंख्यांकांचे रक्षण केले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

संविधान आणि समाजाच्या रक्षणासाठी सर्वांना एकत्र यावे लागेल असा स्पष्ट संदेश त्यांच्या भाषणातून त्यांनी दिला आहे. सपकाळ यांचे भाषण सामाजिक आणि वैचारिक होते. नजर को बदलो तो नजारे बदल जाते हैं अशा काव्यात्मक शैलीत त्यांनी देशातील दिशाभूल करणाऱ्या प्रवाहांविरोधात वैचारिक मशाल उंचावली. सपकाळ यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. उद्योग बाहेर जाणे, राज्यातील सांस्कृतिक आणि भाषिक एकतेचे खच्चीकरण करणे हे महाराष्ट्र धर्माविरोधातील कृत्य असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.

Chandrashekhar Bawankule : नियमबाह्य काम करणाऱ्या वाळू डेपोंविरुद्ध कारवाई

भाजप हे फोडाफोडीचे राजकारण करत आहे. व ते महाराष्ट्राच्या मुळावर उठले असल्याचा गंभीर इशारा त्यांनी दिला. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर तो कौटुंबिक नव्हे तर सामाजिक ऐक्याचा विजय आहे. असे सांगत त्यांनी ठाकरे बंधूंच्या जवळिकीचे स्वागत केले. आम्ही भारत जोडोवाले आहोत, कुटुंब फोडणारे नाही. असा ठाम निर्वाळा देत त्यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!