महाराष्ट्र

Harshwardhan Sapkal : इंजिन चालवायला भाजपचं, इंधन वापरलं काँग्रेसचं 

Congress : चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानावर हर्षवर्धन सपकाळांची सडकून टीका

Share:

Author

हर्षवर्धन सपकाळ यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानावर जोरदार उत्तर देत भाजपच्या विरोधाभासावर भाष्य केलं आहे. भाजपच्या काँग्रेसमुक्त भारताच्या नाऱ्यात आता काँग्रेसचं साम्राज्य झालं आहे, अशी टीका त्यांनी केली. 

राजकीय रणधुमाळीत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची सळसळ सुरू असतानाच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या एका वादग्रस्त विधानाला प्रत्युत्तर देताना, सपकाळ यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. काँग्रेसमुक्त भारत करताना भाजप काँग्रेसयुक्त झाला आहे, अशा शब्दांत त्यांनी भाजपच्या राजकीय रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

सपकाळ यांनी म्हटले की, काँग्रेसचे कार्यकर्ते फोडा, अशी उघडपणे भूमिका घेणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष हेच आज काँग्रेसमुक्तीची भाषा करताना विसरलेत की, भाजप आता काँग्रेसयुक्त झाला आहे. अनेक जण वैयक्तिक अडचणींमुळे भाजपमध्ये प्रवेश करत असले तरी त्यातून काँग्रेस संपली आहे, असा निष्कर्ष काढणं हास्यास्पद आहे. भाजप काँग्रेस फोडायला निघाली होती. पण काँग्रेस नेत्यांच्या बळावर भाजप स्वतःचा विस्तार करत आहे. भाजपने यामधून काहीतरी शिकायला हवे, असा घणाघात सपकाळ यांनी केला. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खमंग चर्चा रंगली आहे.

ना दिशा, ना धोरण

पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर तीव्र टीका करत, “काँग्रेसला फोडा, रिकामी करा” असं स्पष्ट सांगितलं होतं. त्यांनी सांगितलं की, संग्राम थोपटेंसारख्या नेत्यांनी सर्वस्व काँग्रेसला दिलं, तरीही पक्ष सोडावा लागला. काँग्रेसकडे ना दिशा, ना धोरण. राहुल गांधींकडून कुठलीच अपेक्षा उरलेली नाही. काँग्रेसमधून किंवा अन्य पक्षांमधून आमच्याकडे येणाऱ्यांचं स्वागत आहे. इतके लोक आमच्याकडे येतील की, तुम्ही थकून जाल, अशा शब्दांत बावनकुळे यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावर प्रहार केला.

Buldhana : तीन दशकांनंतर शेतीचा रस्ता खुला

भाजपने आपली संघटना वाढवण्यासाठी सर्वच पक्षांतील लोकांना सामावून घेण्याचं धोरण स्वीकारल्याचेही बावनकुळे यांनी या बैठकीत जाहीर केलं. मात्र, हर्षवर्धन सपकाळ यांनी त्याच मुद्द्यावरून भाजपवर बोट ठेवलं. भाजपची ही रणनीती म्हणजे काँग्रेसच्या नावाने एकीकडे शंख, आणि दुसरीकडे काँग्रेसचेच कार्यकर्ते भाजपमध्ये घेत राहणं. हे विरोधाभास दर्शवणारे धोरण आहे, असं काँग्रेसचे म्हणणं आहे.

त्यांच्याच भूमिकेमुळे नुकसान

बावनकुळे यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला होता. शरद पवार साहेबांकडे कोणी जायला तयार नाही. उद्धव ठाकरेंची शिवसेना तर लोक विसरून गेले आहेत. वक्फ बोर्डाच्या विधेयकावर त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळेच त्यांच्या पक्षाचे लोक आता आमच्याकडे येत आहेत, असा दावा त्यांनी केला.

Udayanraje Bhosale : फाळणीच्या जखमा अजूनही ताज्या

राजकारणात एकमेकांवर कुरघोडी करणं नवीन नाही. मात्र, काँग्रेसमुक्त भारतची घोषणा देणाऱ्या भाजपने आज काँग्रेसमधून आलेल्यांनाच प्रमुख पदांवर ठेवण्याचा मार्ग स्वीकारल्याचा आरोप काँग्रेसकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन सपकाळ यांचे वक्तव्य केवळ टीका नसून, भाजपच्या अंतर्गत विरोधाभासांवर बोट ठेवणारी राजकीय प्रतिक्रिया ठरत आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!