महाराष्ट्र

Harshwardhan Sapkal : भाजपचं नवं सूत्रं गुन्हे मागे टाका, पक्षात या

BJP : सुधाकर बडगुजर प्रवेशले, दाऊद उरला तरी?

Author

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर गुन्हेगारांना पक्षात घेण्याचा आरोप करत दाऊदलाही प्रवेश देणार का? असा सवाल उपस्थित केला.

राजकारणात पक्षांतर ही काही नवीन बाब नाही. मात्र, ज्यांच्यावर कधी काळी गंभीर आरोप झाले, त्यांनाच सन्मानाने पक्षात घेण्याचा भाजपाचा धडका पवित्रा आता जोरदार चर्चेचा विषय ठरतो आहे. भारतीय जनता पक्ष हे स्वतःला जगातील सर्वात मोठं राजकीय संघटन मानतो. परंतु, ‘पक्षविस्ताराच्या मोहिमेत कोणालाही सामील करून घ्या’ हे धोरण अलीकडच्या काळात अधिकच ठळक झालं आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. सपकाळांनी विचारलेला सवाल साधा नाही.

त्यांनी थेट विचारलं, ‘आता भाजप दाऊद इब्राहिमलाही पक्षात घेणार का?’ त्यांच्या मते, भाजपने आतापर्यंत ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांनाच प्रवेश देऊन मंत्रीपदही बहाल केलं. इतकंच नव्हे, तर एका अशा व्यक्तीला, ज्याचं नाव माफिया दाऊद इब्राहिमशी जोडलं गेलं होतं, त्यालाही पक्षप्रवेश देण्यात आला.या पार्श्वभूमीवर सपकाळ यांनी भाजपच्या हिंदुत्ववादी भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हिंदुत्वाच्या नावाने सगळीकडे गोंधळ घालणाऱ्या भाजपने आता स्वतःचं भान हरवले आहे. जे माणूस पूर्वी गुन्हेगारी संबंधात गुंतले होते, त्यांनाच आता हिंदुत्व मान्य झालंय म्हणून भाजपमध्ये घेणं, हे कोणतं नैतिक नेतृत्व? असा सवाल त्यांनी केला.

IPS Archit Chandak : पोलिस विभागात लवकरच फेरबदल

वॉशिंग मशीनचा वापर

सपकाळांनी विधानसभेत भाजप आमदार नितेश राणे यांनी केलेल्या आरोपांची आठवण करून दिली. राणेंनी नाशिकच्या सुधाकर बडगुजर यांनी ‘दाऊदचा गुंड’ सलीम कुत्तासाठी आयोजित केलेल्या पार्टीचे फोटो विधानसभेत दाखवले होते. त्यावेळी त्यांनी कारवाईची मागणी केली होती. आज त्याच बडगुजर यांना पक्षात सामावून घेतलं जातंय, यावर काँग्रेसने जोरदार टीका केली आहे.या संपूर्ण घटनाक्रमात अजून एक बाब लक्षवेधी ठरली. सुधाकर बडगुजर यांचा पक्ष प्रवेश होतोय, याची माहिती खुद्द भाजप प्रदेशाध्यक्ष व कार्याध्यक्षांनाही दुपारपर्यंत नव्हती.

मग पक्ष नक्की चालतोय कोणाच्या हातात? असा मुद्दा हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला. त्यांनी भाजपवर ‘वॉशिंग मशीन’चा वापर करून गुन्हेगारांना स्वच्छ करणाऱ्या पक्षाचा ठपका ठेवला. इक्बाल मिर्चीसोबतच्या आर्थिक व्यवहारांमध्ये अडकलेले प्रफुल्ल पटेल यांच्याशी युती करून भाजपने आपलं खोटं हिंदुत्व उघडं केल्याचंही त्यांनी स्पष्ट केले.सपकाळांच्या मते, ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणवणाऱ्या भाजपमध्ये आता गुंड, मवाली, भ्रष्टाचारी यांचाच भरणा झाला आहे. राजकीय स्वार्थासाठी हिंदुत्वाची भाषा करणाऱ्या भाजपने आता समाजासमोर आपली खरी ओळख दाखवली आहे.

Parinay Fuke : विकास दिसतो म्हणूनच प्रत्येकजण भाजपकडे येतो

‘हिंदुत्वाच्या बुरख्याआड भ्रष्ट प्रवृत्तींना स्वीकारणाऱ्या भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आणणं हे काँग्रेसचं कर्तव्य आहे,’ असंही त्यांनी शेवटी ठामपणे नमूद केले.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!