महाराष्ट्र

Harshwardhan Sapkal : आरएसएसच्या विषारी कारभारावर तीव्र प्रतिक्रिया

Congress : संविधान सत्याग्रह पदयात्रेत काँग्रेसचा आवाज

Post View : 26

Author

हर्षवर्धन सपकाळ यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100 वर्षांच्या काळ्या कारभाराचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी संविधानाचे पायमल्ली करणाऱ्या संघावर टीका करत शेतकऱ्यांसाठी तातडीची मदत आणि दिवाळीपूर्वी कर्जमाफीची मागणी केली आहे.

महाराष्ट्राच्या मातीतून संविधानाच्या रक्षणासाठी एक ललकारी घुमत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्तीवर तीव्र शब्दांत हल्ला चढवला आहे. वर्धा जिल्ह्यातील संविधान सत्याग्रह पदयात्रेतून त्यांनी संघाच्या कथित काळ्या कारभाराचा जाहीर निषेध केला. या यात्रेत जनतेचा उत्स्फूर्त सहभाग आणि संविधानाच्या मूल्यांप्रती निष्ठा दिसून येत आहे. सपकाळ यांच्या नेतृत्वाखालील ही चळवळ सामाजिक समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वासाठी लढण्याचे प्रतीक बनली आहे.

वर्धा येथील खडकीपासून सुरू झालेली ही पदयात्रा लालवानीपर्यंत पोहोचली आहे. उद्या ती सेवाग्राम आश्रमात दाखल होणार आहे. महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांच्यासह अनेक दिग्गज नेते आणि स्वयंसेवी संघटनांचे कार्यकर्ते या यात्रेत सहभागी झाले आहेत. सपकाळ यांनी यावेळी शेतकऱ्यांच्या व्यथांकडेही लक्ष वेधले. अतिवृष्टी आणि महापुरामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि कर्जमाफीची मागणी त्यांनी लावून धरली. संविधानाच्या रक्षणासोबतच सामान्य माणसाच्या हक्कांसाठी हा लढा आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

Prakash Ambedkar : काँग्रेससोबत युतीस हरकत नाही

शतकाला काळा ठप्पा

हर्षवर्धन सपकाळ यांनी आरएसएसच्या शतकपूर्तीला ‘शिशुपालाची शंभरी’ अशी उपमा देत त्यांच्या विचारसरणीवर कडाडून टीका केली. मनुस्मृती आणि बंच ऑफ थॉट्स यांचे दहन करून संघाने स्वतःचे विसर्जन करावे, असे आवाहन त्यांनी केले. संविधानाने प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता दिली. मात्र, संघाने जाती-धर्मात द्वेष पेरला आणि सामाजिक एकतेचा गळा घोटला, असा आरोप त्यांनी केला. संघाला तिरंगा आणि संविधान मान्य नाही. त्यांनी माणसामाणसांत भेद निर्माण केले. मंदिर प्रवेश नाकारले आणि स्त्री-पुरुष समानतेचा अवमान केला, असे सपकाळ म्हणाले. त्यांनी संघाला संविधान स्वीकारण्यास आणि गांधींचा आदर करत नोंदणी करण्याचे आव्हान दिले.

Gadchiroli Police : घनदाट जंगलातून भीतीचा अंधार हटवला 

शेतकऱ्यांच्या दुरवस्थेवर बोलताना सपकाळ यांनी सरकारवर निशाणा साधला. अतिवृष्टी आणि महापुराने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सरकार मात्र पंचनाम्याच्या नावाखाली वेळकाढूपणा करत आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. त्यांनी ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50 हजार रुपये तातडीची मदत आणि जमीन खरडून गेल्याबद्दल हेक्टरी 5 लाख रुपये देण्याची मागणी केली. दिवाळीपूर्वी कर्जमाफी करून शेतकऱ्यांना दिलासा द्या, असे त्यांनी महायुती सरकारला सुनावले. सपकाळ यांच्या या लढ्याने संविधान आणि सामान्य माणसाच्या हक्कांचा जागर पुन्हा एकदा उजागर झाला आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!