महाराष्ट्र

Parinay Fuke : जनतेच्या मनात ‘हिट’, आरोग्याच्या बाबतही अगदी ‘फिट’

Fitness 365 Day : राजकारण अन् आरोग्याचा साधला सुवर्ण योग

Author

राजकारण म्हणजे रोजचेचे युद्ध. टीका करणारे, भेटायला येणारे, कार्यकर्ते असा सगळ्यांचाच गराडा. त्यातही महत्वाचं एखादं पद असेल तर अशा व्यक्तीला बरेचदा उसंतही घेता येत नाही. धकाधकीच्या जीवनात रोजचं कामकाज आणि फिटनेस यांच्या सुवर्णयोगाचं महत्व पटवून दिलं ते आमदार डॉ. परिणय फुके यांनी.

राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री, बॉलीवूडस्टार यांच्या जीवनशैलीबद्दल सर्वसामान्यांच्या मनात नेहमीच उत्सुकता असते. कामाच्या व्यापामुळं अनेक तास व्यस्त राहणारी ही मंडळी आपल्या फिटनेसकडं कसं लक्ष देतात, हे गूढ अनेकांना जाणून घ्यायचं असतं. पंतप्रधान झाल्यानंतर तर नरेंद्र मोदी यांनी आपला फिटनेस मंत्र जगापुढं ठेवला. त्यामुळंच जगाच्या पाठीवर आंतरराष्ट्रीय योग दिनाची मुहूर्तमेढ रोवली गेली. मोदी आणि भारत यांच्यामुळंच जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला होता.

भारतामुळंच जगाला वेद, उपनिषद, पुराण आणि योग सारख्या विद्यांची उकल झाली. योग केवळ शरीरालाच नव्हे तर मनालाही परिपूर्ण आरोग्य प्रदान करणारी क्रिया आहे. राजकीय वर्तुळात सक्रिय असताना आपणही कसं फिटनेसकडं लक्ष देतो, याची अलीकडेच उकल केली ती भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी. निमित्त होतं स्वस्थ नागपूर, सक्षम नागपूर या संकल्पनेला मूर्त स्वरूप देणाऱ्या ‘फिटनेस 365 डे’ उपक्रमाच्या द्वितीय वर्धापनदिनाचं.

Prakash Ambedkar : महात्मा फुलेंच्या चित्रपटावर सेन्सॉरची कात्री

निरोग ठेवी योग

कोविड महासाथीच्या काळात जगाला आरोग्यमयी जीवनाचं महत्व आणखी पटलं. महासाथीमुळं अख्खं जग थांबलं होतं. पिळदार दंड आणि भारदस्त छाती बनविणारे जीमही बंद होते. त्यामुळं बहुतांश लोकांनी योग विद्येची कास धरली. याच योग विद्येचं महत्व आमदार डॉ. परिणय फुके यांनी विशद केलं. फुके हे वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर नसले तरी राजकारण करताना कोणाला कोणतं औषध द्यायचं हे त्यांचा चांगलच ठाऊक आहे. प्रसंगी न ऐकणाऱ्या अधिकाऱ्यांना कठोर कारवाईचं इंजेक्शनही ते सरकारला टोचायला लावतात. अलीकडेच काही प्रकरणांमधून याची प्रचिती आली. मात्र राजकारणात प्रचंड वेगानं मार्गक्रमण करणारे डॉ. फुके हे देखील फिटनेसबद्दल तितकेच जागरूक असल्याचं ‘फिटनेस 365 डे’ उपक्रमाच्या कार्यक्रमातून दिसून आलं.

नागपूरकरांनाही त्यांनी आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाबाबत सजग राहावे, असा सल्ला दिला. सिमेंटचं जंगल, भौतिक सुख, सततची धावपळ, टेन्शन, जीवघेणी स्पर्धा यातच अवघं विश्व नाही. तणावमुक्त अन् निरोगी आयुष्य यातच सर्वकाही दडलं आहे, असं डॉ. फुके म्हणाले. माणूस किती जगला यापेक्षा तो आयुष्य कसा जगला याचा अलीकडच्या काळात महत्व आहे. निरोगी तन आणि मन किती गरजेचं आहे, हे त्यांनी उपस्थिताना समजावून सांगितलं. अॅड. संजय घाटे यांच्या नेतृत्वातील उपक्रमामुळं दोन वर्षांत नागपूरकरांच्या आयुष्यात आरोग्याबाबत सकारात्मक परिवर्तन घडल्याचंही आमदार डॉ. फुके म्हणाले. माजी नगरसेविका डॉ. परिणिता फुके, डॉ. रमा फुके यांचीही कार्यक्रमाला उपस्थिती होती. त्यामुळं डॉक्टरांचं कुटुंब असलेला फुके परिवार राजकारणापेक्षा समाजकारण अन् नागरिकांच्या आरोग्याला कितपत प्राधान्य देत आहे, याची एकूणच प्रचिती आली.

Gadchiroli : दीड कोटींचा धान घोटाळा उघड

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!