महाराष्ट्र

माजी गृहराज्यमंत्र्याच्या गावात Pankaj Bhoyar यांची पहिली भेट

पोलिस दलाशी संवाद साधून कायदा-सुव्यवस्थेवर होणार महत्त्वपूर्ण चर्चा

Author

राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर आज अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते आज थेट  पोलिस अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत

राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर आज 6 फेब्रुवारी रोजी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांशी ते थेट संवाद साधणार आहेत. कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यांवर महत्वपूर्ण चर्चा अपेक्षित आहे. विशेष म्हणजे, हा दौरा माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या गावात होणार आहे. प्रशासन व राजकीय वर्तुळात या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

डॉ. रणजित पाटील हे अकोला जिल्ह्यातील प्रभावशाली नेते मानले जातात. भाजप सरकारच्या कार्यकाळात त्यांनी गृहराज्यमंत्रीपद भूषवले होते. पंकज भोयर यांच्या पहिल्या भेटीमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात सकारात्मक बदलाची अपेक्षा आहे. 

भाजप अन् Narendra Modi यांना इव्हेंट करून प्रसिद्ध राहण्याची सवय

पोलीस दलाशी थेट संवाद 

गृहराज्यमंत्री भोयर यांच्या या दौऱ्यात जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यातील गुन्हेगारी स्थिती, आव्हाने, तंत्रज्ञान, अत्याधुनिक साधनांची गरज यासंदर्भात चर्चा होणार आहे. पोलिस दलाच्या कार्यक्षमतेत वाढ करून कायदा सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या उपाययोजनांवरही विचार होणार आहे. स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध मुद्द्यांचे सखोल अहवाल तयार केले आहेत. गृहराज्यमंत्र्यांसमोर ते मांडले जाणार आहेत. पोलिस दलासाठी आवश्यक असलेल्या साधनसामग्री व मनुष्यबळाबाबत सकारात्मक निर्णय अपेक्षित आहेत.

माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या गावात विद्यमान गृहराज्यमंत्र्यांची ही पहिलीच भेट असल्याने या दौऱ्याला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे या भेटीचे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष संदर्भ महत्त्वाचा मानला जात आहे. विशेष म्हणजे, या दौऱ्यात कोणत्याही राजकीय वादाला तोंड न देता प्रशासन आणि पोलिस दलाच्या प्रगतीसाठी सकारात्मक चर्चा होईल, अशी स्थानिकांची अपेक्षा आहे.

दादा, साहेबांच्या जिल्ह्यासह राज्यात BJP कडून बारीक वॉच

 

स्थानिकांच्या अपेक्षा 

या दौऱ्यामुळे अकोल्यातील नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. पोलिस दलाच्या कार्यक्षमतेत सुधारणा आणि गुन्हेगारी नियंत्रणासाठी महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. स्थानिक पोलिस दलाच्या समस्यांचे निराकरण आणि संसाधनांबाबत सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे.

या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जोरदार तयारी केली असून सुरक्षेचे कडेकोट उपाय केले आहेत. पोलिस प्रशासनाने बैठकीच्या आयोजनासाठी विशेष नियोजन केले असून गृहराज्यमंत्र्यांच्या सूचनांचा सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे. 
 

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!