महाराष्ट्र

IAS Dinesh Waghmare आता सांभाळणार “ही” जबाबदारी

मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून असतील कार्यरत 

Post View : 35

Author

राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी आयएएस अधिकाऱ्याची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. 

राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर महायुती सरकारकडून अनेक निर्णय घेण्यात आले. शासकिय अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या पदांवर नियुक्ती आणि बदल्या देखील करण्यात आल्या. राज्य शासनाने वरिष्ठ भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी दिनेश वाघमारे यांची राज्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी आयएएस वाघमारे यांची या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

मागील वर्षाच्या अखेरीस हे पद रिक्त झाले होते. महाराष्ट्र शासनाद्वारे जारी करण्यात आलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार आयएएस दिनेश वाघमारे हे पाच वर्षांच्या कालावधीसाठी हे पदभार सांभाळणार आहेत. ते या पदावर पुनर्नियुक्तीसाठी पात्र राहणार नाही, असेही सांगण्यात आले आहे.

Foreign मधून शिक्षण

आयएएस दिनेश वाघमारे हे 1994 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VNIT) नागपूर येथून वाघमारे यांनी बी.ई. पूर्ण केले. बी.टेक. (Electronics) मध्ये त्यांनी पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर त्यांनी आयआयटी खरगपूरमधून संगणक विज्ञानात एम.टेक पदवी देखील मिळवली आहे. इंग्लंडमधील ब्रॅडफोर्ड विद्यापीठातून विकास आणि प्रकल्प नियोजन या विषयात दिनेश वाघमारे एम.एससी. सुद्धा केले आहे.

मंत्र्यांच्या कामांबाबत Devendra Fadnavis झालेत कठोर

निलेश वाघमारे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी सामाजिक न्याय विभाग, सामान्य प्रशासन आणि ऊर्जा विभागांमध्ये प्रधान सचिव अशा महत्त्वाच्या पदांवर कार्यरत होते. त्यांनी राज्य सरकारच्या महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणूनदेखील काम सांभाळले आहे. ते निवृत्त नोकरशहा यू.पीए.स मदन आहेत. यू.पी.एस. मदन यांच्या जागी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यू.पी.एस. मदन यांचा राज्य निवडणूक आयुक्त (एसईसी) म्हणून कार्यकाळ गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पूर्ण झाला होता.

दिनेश वाघमारे राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कार्यरत असतील. ते जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायती, महानगरपालिका बृहन्मुंबई महानगरपालिकासह (BMC) च्या मतदार याद्या तयार करण्याचे आणि निवडणुकांचे आयोजन करण्याचे पर्यवेक्षण, मार्गदर्शन आणि नियंत्रण यासाठी जबाबदार असतील. महाराष्ट्रातील परिषदांच्या काळजी घेतील. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने 16 जानेवारी 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एसईसी पदासाठी उमेदवाराची शिफारस करण्याचे अधिकार दिले.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!