महाराष्ट्र

Amaravati : रेल्वे प्रवासाची भेळ संपली, आता फ्लाईट स्नॅक्स संस्कृती सुरू

Maharashtra Budget Session : अमरावती विमानतळावरून पहिला टेक-ऑफ

Author

 एकतीस मार्चपासून अमरावती विमानतळावरून प्रवासी विमानसेवा सुरू होत आहे. मुंबई-अमरावती-मुंबई मार्गावर विमान उड्डाण करणार आहे. यामुळे अमरावतीकरांचा प्रवास सोपा आणि जलद होईल.

अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर एकतीस मार्चपासून अमरावती विमानतळावरून प्रवासी विमानसेवा सुरू होत आहे. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात ही मोठी घोषणा केली असून, या निर्णयामुळे विदर्भाच्या प्रगतीला गती मिळणार आहे.

राज्यातील हवाई कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या उद्देशाने UDAN योजनेअंतर्गत मुंबई-अमरावती-मुंबई मार्गावर अलायन्स एअरच्या एटीआर 72 आसनी विमानाची सेवा सुरू करण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांना प्रवासाचा वेगवान, आरामदायक आणि सुरक्षित पर्याय उपलब्ध होईल. यापूर्वी अमरावतीकरांना विमानसेवेसाठी नागपूर किंवा अन्य शहरांवर अवलंबून राहावे लागत होते.

Congress : फडणवीसांच्या शैलीत सपकाळांचा जोरदार हल्लाबोल 

विमानतळाची आधुनिक सुविधा

अमरावती विमानतळावर पॅसेंजर टर्मिनल, अत्याधुनिक एटीसी टॉवर, हवाई सुरक्षेसाठी अत्याधुनिक उपकरणे, नव्याने विकसित 18 बाय 50 मीटर धावपट्टी यांसारख्या सर्व सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) ही धावपट्टी 72 आसनी विमानांसाठी योग्य असल्याचे प्रमाणित केले आहे.

महत्त्वपूर्ण चाचण्या यशस्वी

विमान उड्डाणासाठी अत्यावश्यक असलेल्या पीएपीआय (Precision Approach Path Indicator) प्रणालीची यशस्वी चाचणी नुकतीच पूर्ण झाली आहे. बंगळुरूहून आलेल्या फ्लाइट इन्स्पेक्शन युनिटने अमरावती विमानतळाची तपासणी केली असून, तांत्रिक चाचण्या यशस्वी झाल्यानंतरच प्रवासी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विदर्भाची प्रगती

अमरावती विमानतळ कार्यान्वित झाल्यामुळे विदर्भाच्या व्यापार, उद्योग, शिक्षण आणि पर्यटन क्षेत्रांना चालना मिळणार आहे. गुंतवणूकदार आणि व्यावसायिकांसाठी अमरावती आता आणखी आकर्षक गंतव्यस्थान ठरणार आहे. नागपूरनंतर विदर्भातील हे दुसरे महत्त्वाचे विमानतळ ठरणार आहे, ज्यामुळे संपूर्ण प्रदेशाचा आर्थिक आणि सामाजिक विकास वेग घेईल.

दूरदर्शी निर्णय

महायुती सरकारने राज्यातील महत्त्वाच्या शहरांना हवाई मार्गाने जोडण्याच्या उद्देशाने अमरावती विमानतळाचा विकास केला आहे. या विमानसेवेच्या माध्यमातून शहराच्या आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू होणार आहे. हवाई सेवा सुरू झाल्यानंतर भविष्यात इतर शहरांसोबतही कनेक्टिव्हिटी वाढवण्याचे नियोजन आहे.एकतीस मार्चपासून अमरावतीकरांसाठी नवीन युग सुरू होत आहे. विमानतळाचे उद्घाटन हे शहराच्या भविष्यासाठी मोलाचे पाऊल ठरणार असून, यामुळे स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावर अमरावतीच्या विकासाला गती मिळणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!