देश

देश होणार सागरी क्षेत्रात Navy मुळं शक्तीशाली

पंतप्रधान Narendra Modi यांनी व्यक्त केला विश्वास

Author

भारतीय नौदलात युद्धनौका आणि पाणबुडींचं लोकार्पण करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. मुंबईत हा सोहळा पार पडला.

भारताची वाटचाल मोठ्या सागरी शक्तीच्या दिशेने सुरू आहे. भारताच्या सुरक्षा आणि प्रगतीला मोठे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. निलगिरी युद्धनौका, सूरत विनाशिका आणि वाघशीर पाणबुडीचे लोकार्पण नौदलाच्या गौरवशाली परंपरेला भविष्याशर जोडणारी ऐतिहासिक घटना आहे. भारतात निर्मित सूरत आणि निलगिरी युद्धनौका सर्वोत्तम आहे. वाघशीर ही पाणबुडी देखील अप्रतिम आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पंतप्रधानांच्या हस्ते या तीन नौका मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्राला समर्पित करण्यात आल्या. यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाला राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नौसेना प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात प्रधानमंत्री मोदी म्हणाले की, संपूर्ण विश्व हा परिवार मानून भारत विकासाच्या भावनेने काम करत आहे. भारतीय समुद्र क्षेत्रात भारत प्रथम प्रतिसादकर्ता म्हणून उदयास आला आहे. तीन आघाडीच्या लढाऊ जहाजांचा नौदलामध्ये समावेश ऐतिहासिक क्षण आहे. नौदलाने अनेकांचे जीव वाचवले आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मालवाहतूक सुरक्षित केली आहे.

आनंदवनच्या संस्थेला Ajit Pawr यांनी दिला भक्कम निधी

भारतावर Global Trust

जगभराचा भारतावर विश्वास वाढला आहे. जागतिकस्तरावर विशेषत: ‘ग्लोबल साउथ’मध्ये भारत एक विश्वासार्ह आणि जबाबदार भागीदार म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. तीन युद्धनौकांचे राष्ट्रार्पण सैन्याबरोबरच आर्थिक दृष्टीने सुद्धा महत्त्वाचे आहे. जमीन, पाणी, हवा, खोल समुद्र किंवा अनंत अवकाश अशा सर्वच क्षेत्रात भारताने आपले वर्चस्व निर्माण केलं आहे. तीनही सैन्य दलांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात भारत आत्मनिर्भर झाला आहे. ही वाटचाल कायम आहे. एकाच वेळी विनाशिका, युद्धनौका आणि पाणबुडी कार्यान्वित होत आहे. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमीवर भारतीय नौदलाने स्वावलंबी होण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे, असं मोदी म्हणाले.

भारतीय सैनिकांना आता भारतीय युद्ध सामग्री उपलब्ध होत आहे. जगातील अनेक देशांना भारतानं संरक्षण सामग्री निर्यात केली आहे. या माध्यमातून ‘मेक इन इंडिया’चा विस्तार होत आहे. आर्थिक प्रगतीचे दार उघडली गेली आहे. भारताच्या तिसऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करण्याच्या प्रक्रियेत मोठा हातभार लागत आहे, असं मोदी म्हणाले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी भारतीय समुद्री क्षेत्रात देशाची ताकद वाढल्याचं नमूद केलं. संरक्षण क्षेत्रात भारत आत्मनिर्भर झाला आहे. आधुनिकीकरणावर भर दिला जात असल्याचं ते म्हणाले. नौदल प्रमुख ॲडमिरल त्रिपाठी यांनी नौदलासाठी प्रतिष्ठेचा दिवस असल्याचे सांगितलं.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!