महाराष्ट्र

Nagpur BJP : आई रडली, कळवळली पण आमदाराचा असंवेदनशीलपणा

Saoner : मुलगा हरविलेल्या महिलेला पाठ दाखवली

Post View : 86208

Author

आपल्या पोटचा गोळा डोळ्यासमोरून दिसेनासा झाला. अशात एका आईची काय अवस्था होणार. पण भाजपच्या आमदारला ही व्यथा, वेदना कळली नाही.

घार हिंडते आकाशी, झांप घाली पिल्लांपासी हे संत जनाबाईंच्या अभंगातील वाक्य आठवा. एखाद्या आईच्या डोळ्यासमोरून तिचं पिल्लू हरवलं तर तिच्या काळचा ठोका चुकतो. मुलगा वयानं कितीही मोठा झाला तरी तो आईसाठी लहानच असतो. अशीत एक आई डोळ्यात आशा घेऊन भाजप आमदाराच्या भेटीला येते. आमदार पोलिसांना मुलाचा शोध घ्यायला सांगतील अशी आशा तिला असते. कडक इस्त्री असलेले कपडे घालून आमदार साहेब आहे येतात. त्यांच्या आजूबाजूला भाजपचा दुपट्टा घातलेले चमचे फिरत असतात.

मुलगा बेपत्ता झालेली ती आई पुढं सरसावते. आमदाराशी बोलण्याचा प्रयत्न करते. पण आमदार साहेबांना वेळ नसतो. आमदार साहेबत आपल्या आलीशान काळ्या रंगाच्या वाहनात बसतात. कारचा एसी सुरू होतो. आमदार साहेब मस्त एसीत बसतात. कारच्या खिडकीच्या काचा वर असतात. आमदार साहेब चालकाला वाहन काढायला सांगतात. इकडे उन्हातान्हात ती आई रडत असते. विव्हळत असते. कळवळत असते. डोळ्यातील तिच्या आशांची जागा आता अश्रुंनी घेतलेली असते. ‘साहेब माझा मुलगा हरवला आहे. पोलिस काही करत नाहिए’, असं ती ओरडत असते.

न्यायासाठी झटत आहेत Katol येथील शेतकरी

पोलिसांची मध्यस्थी

आमदाराला भेटायला येणाऱ्या या महिलेला पोलिस अडवतात. आपला ‘खाकी’चा रौब तिला दाखवत असतात. विशेष म्हणजे यात पोलिसांना हस्तक्षेप करा, असं आमदारांनी सांगितलं नव्हतं. त्यामुळं सामान्यांनी लोकप्रतिनिधीकडे जाऊ नये का? असा प्रश्न उपस्थित होतो. पोलिस महिलेला अडवतात. त्यानंतर आमदार साहेब आपल्या चमच्यांसह निघून जातात. इतकडे ती महिला प्रसार माध्यमांसमोर आपंल गाऱ्हाणं मांडायला सुरुवात करते. या घटनेची व्हिडीओ सध्या सोशल माध्यमांवर तुफान व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओत दिसणारे आमदार आहेत, सावनेरचे भाजप नेते आशिष देशमुख. या संपूर्ण व्हिडीओमुळं हा नेमका प्रकार काय? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. प्रसार माध्यमांसमोर झालेल्या या प्रकारानंतर सगळीकडे बातमी व्हायरल झाली. आता आमदार आशिष देशमुख यांच्यावर हा व्हिडीओ बघणाऱ्या प्रत्येक सोशल मीडिया युजरनं टीका सुरू केली आहे.

खरं तर आमदार आशिष देशमुख काही सेकंद तिथे थांबू शकले असते. प्रसार माध्यमांपुढं या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा करू शकले असते. मात्र देशमुख यांनी तसं केलं नाही. त्यामुळं ते जनतेच्या व्यथा आणि प्रसार माध्यमांना जुमानत नसल्याची टीका सोशल मीडियावर होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुलगा बेपत्ता होणारी आई कोण? नेमकं हे प्रकरण काय? याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. आमदार आशिष देशमुख हे व्हिडीओत दिसत असल्यानं त्यांच्यावर सरसकट टीका होत आहे. अद्याप आमदार देशमुख यांनी स्वत: किंवा त्यांच्या कार्यालयानं याचा खुलासा केलेला नाही.

नो रिस्पॉन्स

व्हिडीओत दिसत असलेला प्रकार नेमका काय? याबद्दल ‘द लोकहित लाइव्ह’ने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आमदार आशिष देशमुख यांचीही बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला. ‘द लोकहित लाइव्ह’ने थेट देशमुख यांच्या मोबाइलवर संपर्क केला. मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर ‘द लोकहित लाइव्ह’ने देशमुख यांच्यावतीने प्रसार माध्यमांशी संपर्कात राहणाऱ्यांनाही संपर्क केला. मात्र कोणीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळं हा नेमका प्रकार तरी काय? हा मुद्दा अनुत्तरीत राहिला.विशेष म्हणजे नंतर या महिलेचा एक व्हिडीओही पुढं आला ज्यात आपल्याला आशिष देशमुख यांनी मदत केल्याचं तिनं म्हटलं आहे. ही जरी वस्तुस्थिती असली तर प्रश्न येतो तो सार्वजनिक ठिकाणी चारचौघांसमोर सामान्य जनतेशी वागण्याचा. एक सेकंद थांबून यावर बोलण्यास देशमुख यांना काय हरकत होती, असा नेटकऱ्यांचा प्रश्न कायम आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!