महाराष्ट्र

Nagpur : मुख्यमंत्र्यांचे ड्रीम प्रोजेक्ट, वाहतूक नियंत्रण ठेवणार अप टू डेट 

Vidarbha : नागपुरात इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम कार्यान्वित

Author

नागपूरच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडवण्यासाठी इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (ITMS) कार्यान्वित केली जात आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने वाहतूक नियमांचे काटेकोर पालन आणि सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला गेला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी एक असलेल्या इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (ITMS) चं नागपूरमध्ये प्रत्यक्ष काम सुरू झालं आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक आधुनिक, शिस्तबद्ध आणि स्मार्ट करण्याच्या उद्देशान, या महत्त्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. पायलट प्रोजेक्टच्या माध्यमातून निवडक चौकांवर हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर कार्यान्वित केला जात आहे. त्यानंतर संपूर्ण शहरभर त्याची अमलबजावणी केली जाणार आहे.

नागपूर महानगरपालिकेने या प्रोजेक्टसाठी निविदा काढली होती. ज्यामध्ये केरळ स्टेट इलेक्ट्रॉनिक्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (Keltron) या कंपनीने टेंडर जिंकून प्रत्यक्ष काम सुरू केले आहे. प्रायोगिक प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात नागपूर शहरातील काही निवडक जंक्शनवर हा प्रकल्प कार्यान्वित होत आहे.

Atul Londhe : वीज बिल कपातीचे आश्वासन हवेत विरले

कार्यरत होणार ITMS

ITMS पायलट प्रोजेक्ट श्रद्धानंद पेठ, एलएडी चौक, अजित बेकरी चौक, युनिव्हर्सिटी लायब्ररी चौक, शंकरनगर, काचीपुरा चौक, लक्ष्मीनगर, बजाजनगर आणि VNIT चौक या प्रमुख ठिकाणी कार्यान्वित केला जात आहे. भविष्यात संपूर्ण शहरात कँटीलीव्हर पोल (Cantilever Poles) बसवून त्यावर ट्रॅफिक सिग्नल्स कार्यान्वित केले जातील.

योजनेअंतर्गत प्रत्येक सिग्नल पॉईंटवर ANPR (Automatic Number Plate Recognition) आणि RLVD (Red Light Violation Detection System) तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. यामुळे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांवर त्वरित कारवाई केली जाऊ शकते. वाहतुकीतील शिस्तबद्धता आणि सुरक्षेसाठी हा मोठा बदल ठरणार आहे.

भविष्यातील वाटचाल

महानगरपालिकेनं केल्ट्रोन कंपनीला पायलट प्रोजेक्टसाठी 30 एप्रिलपर्यंत संपूर्ण पायाभूत सुविधा उभारण्याचे लक्ष्य दिले आहे. त्यानंतर पुढील 10 दिवस या प्रणालीचे निरीक्षण करण्यात येईल. महानगरपालिका, नागपूर पोलीस विभाग आणि KPMG या कन्सल्टिंग कंपनीच्या संयुक्त देखरेखीखाली हा प्रकल्प सुरू राहणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट असल्यामुळे राज्य सरकारकडून 197 कोटी रुपये आधीच मंजूर करण्यात आले आहेत. पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाल्यास पुढील 15 महिन्यांत संपूर्ण नागपूर शहरात ITMS प्रणाली लागू केली जाईल.

ITMS प्रणालीमुळे नागपूर शहरातील वाहतूक व्यवस्थापन अधिक आधुनिक आणि सुव्यवस्थित होणार आहे. वाहतूक नियमांचे काटेकोर पालन, वाहतूक कोंडी कमी करणे, अपघात रोखणे आणि नागरिकांना सुरक्षित प्रवास देणे हे यामागील प्रमुख उद्देश आहेत. नागपूरमध्ये हायटेक ट्रॅफिक व्यवस्थापन प्रणालीची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे, त्यामुळे शहराच्या स्मार्ट सिटीकडे वाटचालीला मोठी गती मिळणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!