महाराष्ट्र

बदलापूर प्रकरणात अक्षय शिंदेने अत्याचार केला नसल्याचा Jitendra Awhad यांचा दावा 

खऱ्या आरोपींना वाचविण्यासाठी State Government कडून खोटे एन्काऊंटर 

Author

बदलापूर अत्याचार प्रकरणात खऱ्या आरोपींना वाचविण्यासाठी अक्षय शिंदे याला समोर करून त्याच्या एन्काऊंटरचा करण्याचा कट रचण्यात आला. खरा आरोपी अक्षय शिंदे नाही, असे जितेंद्र आवड म्हणाले.

बदलापूर येथील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाला होता. या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. या चकमकीला पोलीसच जबाबदार असल्याचा निष्कर्ष मुंबई उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच दिला आहे. त्यावरून हा एन्काऊंटर खोटा सिद्ध झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारला आरोपांच्या चौकटीत उभे करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, अक्षय शिंदे याने बलात्कार केलाच नाही. पोलिसांना बदनाम करण्यात येत आहे. अक्षय शिंदेला ज्या अंतरावरून गोळी मारली ते अंतर हास्यास्पद आहे. त्याच्या हाताला बेड्या घातलेल्या होत्या. मग तो रिव्हॉल्वर कसा काढणार आणि कोणाच्या खिशातून काढणार? त्या रिव्हॉल्वरवर अक्षय शिंदेचे ठसेच नाहीत, आता तर हेदेखील सिद्ध झाले आहे. हे प्रकरण बलात्काराचं असल्याने लोक या विषयावर बोलायला घाबरतात. परंतु अक्षय शिंदेने बलात्कार केलाच नाही, असे जितेंद्र आवड म्हणाले.

निवडणुकीपूर्वी Mahayuti ची आश्वासने मतदारांसाठी गाजर

मुख्य आरोपीला वाचविण्यासाठी अक्षय शिंदेचा बळी 

बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपींना वाचविण्याकरिता अक्षय शिंदे याला बळी करण्यात आले. बलात्कार केलेल्यांना सोडवण्याकरता अक्षय शिंदेची हत्या झाली. बलात्कार केलेले कोण होते? जे मी जात वर्चस्ववादाची लढाई म्हणतोय, अक्षय शिंदेची हत्या झाल्यानंतर ते लगेच हजर झालेत. यातील सर्वात मोठी गोष्ट असते माणसाची मेमरी शॉर्ट आहे. या एकाच गेमवर सरकार खेळत असतं.”

आव्हाड पुढे म्हणाले की, ज्या ठिकाणी अक्षय शिंदेला मारलं तो मतदारसंघ माझा आहे. अक्षय शिंदेला मारले तेव्हा बाजूला एक चहावाला तिथे उभा होता. त्या चहावाल्याने मला फोन करून संपूर्ण घटना क्रमाची माहिती दिली आहे. इथे काहीतरी झाले आहे. फायरिंग झाल्याचा आवाज आला, असे त्याने सांगितले. त्यानंतर दुपारपर्यंत अक्षय शिंदेची एन्काऊंटर ची माहिती समोर आली. आता प्रश्न हा आहे की, अक्षय शिंदेवर ज्याने गोळ्या झाडल्या त्याच्यावर गुन्हा दाखल करा. त्यांची चौकशी करा, असं न्यायालयाने म्हटलंय. परंतु पहिल्याच दिवशी कोर्टाने विचारलं होतं की हे कसं काय होऊ शकतं? उच्च न्यायालयाने स्वतःहून याचिका उचलली होती. प्रश्न हा आहे की अजून पर्यंत गुन्हा दाखल झालेला कसा नाही? असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!