महाराष्ट्र

अमृतसरमधील खालिस्तानी Chandrapur जिल्ह्यात

Police Station मध्ये फेकला होता हॅण्डग्रेनेड

Author

देशात खालिस्तानी काही न काही चळवळ करतच असतात. तसेच एका खलिस्तानवाद्याने अमृतसर येथे एका पोलीस चौकीवर ‘हँडग्रेनेड’ फेकला होता. त्या खलिस्तानवाद्याला गुप्तचर यंत्रणेने महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे.  गुप्तचर यंत्रणा आणि स्थानिक पोलिसांनी ही कारवाई संयुक्तरित्या पार पाडली. 

चंद्रपुरातून अटक करण्यात आलेल्या खालिस्तानवाद्याचे नाव जसप्रीत सिंग ( वय 20 ) असे आहे. या खालिस्तानवाद्याला शुक्रवारी 10 जानेवारी सकाळी अत्यंत गुप्तपणे ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर या आरोपीला पंजाब पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दिली आहे.

भाजपच्या शिर्डी येथील बैठकीत Nitin Gadkari यांच्या टिप्स

खलिस्तानी जसप्रीत सिंगने 2023 मध्ये अमृतसर येथील पोलिस चौकीवर हल्ला केला होता. अमली पदार्थांच्या व्यवसायातही तो सक्रिय असल्याची माहिती आहे. पोलिस चौकीवरील हल्ल्यानंतर तो फरार झाला होता. तेव्हापासून पंजाब पोलिसांनी त्याच्या पाठलाग सुरू केला होता. महाराष्ट्रात सहा दिवसांपूर्वी तो दाखल झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथे जसप्रीत सिंग आला होता. येथील लॉयड मेटल कंपनीच्या परिसरात तो अन्य ओळखीच्या व्यक्तींसोबत राहत असल्याची माहिती प्राप्त झाली होती. येथूनच गुप्तचर यंत्रणेच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले.

चंद्रपूर जिल्ह्यात पोलाद, पेपर मिल, सिमेंट, आयुध निर्माण कारखाना तसेच वीज केंद्र व इतरही मोठे उद्योग आहेत. परप्रांतीय कामगारांचा या उद्योगात मोठ्या संख्येने समावेश आहे. गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी असलेल्या कामगारांचा देखील या कंपन्यांमध्ये मोठ्या संख्येने समावेश आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे कामगार येथे येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढल्याचा आरोप होत आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!