मिनी बांग्लादेश म्हणून ओळखल्या अमरावतीच्या अचलपूरमध्ये बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळा उघडकीस आला आहे.
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे नेहमीच विरोधकांच्या गैरव्यवहारांचा पाठपुरावा करून ते ईडीपर्यंत पोहोचवणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. सध्या सोमय्या एका नव्या आणि गाजणाऱ्या प्रकरणामुळे पुन्हा राज्यभर दौऱ्यावर आहेत. त्यांनी नुकतेच उपराजधानी नागपूरमध्ये दोन वेळा भेट दिली आहे. राज्यात सुरू असलेल्या बांग्लादेशी जन्मप्रमाणपत्र घोटाळ्याचा ते तपास घेत आहेत. या घोटाळ्यांतर्गत, बनावट माहितीच्या आधारे जन्मप्रमाणपत्र मिळवलेल्या अनेक प्रकरणांचा उलगडा झाला आहे.
अमरावती जिल्ह्यातील अचलपूरमध्ये बांगलादेशी घुसखोरांना बनावट आधार कार्ड व खोटी कागदपत्रं वापरून भारतीय जन्म प्रमाणपत्रं देण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात थेट तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अनियमिततेचे पुरावे पुढे आले आहेत. किरीट सोमय्या यांनी दिली आहे. सोमय्या यांनी महाराष्ट्रात फिरून या प्रकरणाचा पाठपुरावा केला आहे. नागपूरमध्ये त्यांनी दोनदा पत्रकार परिषद घेतली आहे. सोमय्या यांच्या मते, ही केवळ सुरुवात असून, यामागे मोठा रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता आहे.
घुसखोरांची ओळख बदलली
अचलपूरमधील 15 जणांच्या आधार कार्डवरील जन्मतारखा ‘01.01’ म्हणजेच 1 जानेवारी दाखवल्या आहेत. या सर्वांच्या आधार कार्डावरील जन्मतारखा आणि त्यांच्या जन्म प्रमाणपत्रावरील नोंदी वेगळ्या आहेत. हेच दाखवतं की ही सर्व प्रक्रिया बनावट दस्तऐवजांवर आधारित आहे. जसे सय्यद हमीद सय्यद हुसैन यांची आधार कार्डावरील जन्मतारीख 01.01.1938 तर जन्म प्रमाणपत्रावर ती 01.01.1945 अशी नोंद आहे. असेच इतर 14 जणांच्याही बाबतीत आढळून आले. या सगळ्यांना अमरावती महानगरपालिकेने अधिकृत जन्म प्रमाणपत्र जारी केल्याचं उघड झालं आहे.
तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाने या व्यक्तींना केवळ बनावटी आधार कार्ड पाहून प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले. हे प्रमाणपत्र देताना मूळ दस्तावेज तपासण्याची जबाबदारी झुगारण्यात आली, असा आरोप करण्यात येतो आहे. त्यामुळे हे प्रकरण केवळ वैयक्तिक फसवणूक नसून, एका संगनमतातून झालेला मोठा घोटाळा असल्याचा संशय व्यक्त होत आहे. सध्या अमरावती जिल्ह्यात याआधीही बनावट जात प्रमाणपत्र प्रकरण समोर आले होते. अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यात अशाच प्रकारच्या प्रकरणांमध्ये 8 जणांवर गुन्हे दाखल झाले होते.
*बांग्लादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळा*
*कथा अचलपूरची (अमरावती)*
अचलपूर येथील खालील 15 अर्जदार (उदाहरण म्हणून) सगळ्यांची जन्मतारीख 01.01 म्हणजेच एक जानेवारी ह्या तारखेचे जन्म असल्याचे सगळ्यांचे आधार कार्ड
जन्म प्रमाणपत्रासाठी बनावटी आधार कार्ड/कागदपत्रे तहसील कार्यालयात दिले… pic.twitter.com/tyv5GBGvWm
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) May 4, 2025
राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात
पूर्वीही पुन्हा तिघांची अटक झाल्याची माहिती समोर आली होती. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सोशल मीडियावर या प्रकरणाची माहिती प्रसिद्ध केली आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे, एकदा नागरिकत्व मिळाल्यावर या व्यक्तींना मतदार ओळखपत्र, सरकारी नोकऱ्या, शासकीय योजनांचा लाभ यासारख्या अधिकारांपर्यंत थेट प्रवेश मिळतो. त्यामुळे या प्रकरणाकडे केवळ बनावट प्रमाणपत्र म्हणून न पाहता, राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनेही पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.
Amravati : हातात फावडा, खिशात नाही पगार, तिवसातील कामगारांचा संतप्त एल्गार