महाराष्ट्र

Yashomati Thakur : भाजपच्या छत्रछायेत अध्यात्माच्या नावाखाली हिंसेचा प्रकार

Political Threats : बाळासाहेब थोरातांविरुद्ध कीर्तनकाराची थेट धमकी

Post View : 29

Author

संग्राम भंडारे यांनी संगमनेर कीर्तनात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना धमकी दिल्यामुळे राज्यभरात राजकीय ताप वाढला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच विरोधक एकमेकांवर टीका, वादग्रस्त वक्तव्य आणि कधीकधी धमक्या देत असतात. मात्र, गेल्या काही दिवसांत हा प्रकार अजून एका चिंताजनक वळणावर पोहोचला आहे. संगमनेर येथे झालेल्या कीर्तन कार्यक्रमात कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी केल्या जाणाऱ्या राजकीय वक्तव्यांमुळे स्थानिक राजकारण चांगलेच तापले आहे. विशेष म्हणजे, त्यांनी व्हिडीओद्वारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे नाव घेत थेट धमकी दिल्याचे विधान केले. आपल्याला नथुराम गोडसेसारखे वागावे लागेल, असे भंडारे म्हणाले, ज्यामुळे राज्यभरात राजकीय वाद उठला आहे.

भंडारे यांचे हे वक्तव्य फक्त धमकीच नाही तर समाज विघातक म्हणून देखील पाहिले जात आहे. या प्रकरणामुळे विरोधकांनी चांगला संताप व्यक्त केला असून काँग्रेसकडून लगेचच निषेध नोंदवण्यात आला. काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनीही या घटनेवर तिखट शब्दांत प्रतिक्रिया दिली. स्वतःला कीर्तनकार म्हणणारा संग्राम भंडारे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना धमकी देतोय, तसेच नथुराम गोडसेंचा गौरव करत आहे, असे ठाकूर यांनी म्हटले. त्यांनी या घटनेला अध्यात्म आणि वारकरी संप्रदायाच्या पवित्र नावाला काळिमा फासणारी कृती मानली. यशोमती ठाकूर यांनी विशेषतः या संघटित कट्टरते विरुद्ध आवाज उठवला.

B. Sudarshan Reddy : न्यायालयीन जगताचे स्टार, आता उपराष्ट्रपती पदासाठी उभे

कीर्तनातून राजकीय वाद

भाजप आणि त्यांच्या कट्टर संघटनांच्या छत्राखाली अध्यात्माच्या नावाखाली हिंसा, दहशतवाद आणि खुनाच्या धमक्या दिल्या जात आहेत. बाळासाहेब थोरात यांसारख्या सुसंस्कृत नेत्याला धमकी देणाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई होणे गरजेचे आहे, असे यशोमती ठाकूर यांनी सांगितले. त्यांनी महाराष्ट्राची भूमी संत, वारकरी, भक्ती आणि समतेच्या परंपरेची असल्याचेही स्पष्ट केले. नथुरामाचा गौरव करणाऱ्यांना या भूमीत स्थान नाही असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. शनिवारी (16 ऑगस्ट रोजी) रात्री घुलेवाडी गावात झालेल्या कीर्तनावेळी संग्राम भंडारे यांनी राजकीय भाष्य केले. ज्यामुळे काही जणांनी आक्षेप घेत गोंधळ घातला.

हभप संग्राम महाराज भंडारे यांच्यावर मारहाण झाल्याचा गुन्हा संगमनेर शहर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला. सोमवारी (18 ऑगस्ट रोजी) झालेल्या निषेध आंदोलनात शिवसेना आमदार अमोल खताळ आणि भाजप अध्यात्मिक सेलचे अध्यक्ष तुषार भोसले देखील सहभागी झाले. या आंदोलनात मारहाणीसाठी बाळासाहेब थोरात यांचे नाव घेतले गेले. तुषार भोसले यांनीही थोरात यांच्यावर टीका केली, तर थोरात यांनी खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आजी-माजी आमदार समोरासमोर येणार असल्याने या वादाचा पाटल पुढेही वाढण्याची शक्यता आहे.

Balwant Wankhede : विद्यापीठातील रस्ते दुरुस्तीच्या यादीत

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर यांनी नागपुरातील धनवटे नॅशनल कॉलेजमधून पत्रकारिता व जनसंज्ञापन विषयात पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. 2023-24 मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी द लोकहित लाइव्ह येथे आपल्या करीअरला सुरुवात केली.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!