महाराष्ट्र

कामगारांच्या सुरक्षेला Labour Minister कडून ‘टॉप प्रायोरिटी’

कॅबिनेट मंत्री Akash Fundkar सूत्र स्वीकारतात Action Mode मध्ये 

Author

Views: 18764

राज्यभरातील श्रमिकांच्या सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य देण्याचे आदेश कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिले आहे. कामगार विभागाचे मंत्री म्हणून त्यांनी पदभार स्वीकारताच अधिकाऱ्यांची बैठक घेतली. 

आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे अनेकांना अंग मेहनत करावी लागते. राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योग आणि कारखाने आहेत. या कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्या देखील मोठी आहे. धोकादायक आणि अतिधोकादायक उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची सुरक्षा महत्त्वाची आहे. महायुती सरकार या कामगारांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणार आहे. त्यामुळे कामगारांच्या सुरक्षेबाबत कोणतीही ‘कॉम्प्रमाईज’ करू नका. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी हे आदेश दिले.

महायुतीच्या सरकारमध्ये खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आकाश पांडुरंग फुंडकर यांची कॅबिनेट मंत्री पदी वर्णी लागली. त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामगार विभागाची धुरा सोपवली आहे. आकाश फुंडकर यांनी शुक्रवारी, 27 डिसेंबर कामगार मंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर तातडीने त्यांनी या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. कामगार विभागाच्या कामकाजाची संपूर्ण माहिती फुंडकर यांनी जाणून घेतली.

जादू Parinay Fuke यांची; मधुकर कुकडे तिकडून इकडे

Simple आहेत नवे मंत्री

पश्चिम विदर्भातील आमदार असलेले आकाश फुंडकर हे देखील आपल्या साधेपणासाठी ओळखले जातात. मंत्रालयात पोहोचल्यानंतर त्यांनी आपल्या कक्षामध्ये पूजन केले. देवाला नमस्कार आणि नैवेद्य अर्पण केल्यानंतर त्यांनी कामगार मंत्री म्हणून सूत्र स्वीकारली. कामगार आयुक्त सतीश देशमुख, विकास आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आकाश फुंडकर यांचे स्वागत केले. मंत्री म्हणून फडणवीस सरकारमध्ये वर्णी लागल्यानंतर आकाश फुंडकर यांनी नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. फुंडकर यांचे वडील पांडुरंग उपाख्य भाऊसाहेब फुंडकर अकोला लोकसभा मतदारसंघाचे अनेक वर्ष खासदार होते. त्यामुळे अकोल्यामध्ये देखील आकाश फुंडकर यांनी भाजपच्या नेत्यांची भेट घेतली.

अकोला पश्चिमचे दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा आणि पांडुरंग फुंडकर हे एकेकाळचे सहकारी. त्यामुळे आकाश फुंडकर यांनी गोवर्धन शर्मा यांच्या स्मृतीला अभिवादनही केले. त्यानंतर त्यांनी आपले वडील पांडुरंग फुंडकर यांच्या स्मृतिस्थळाला भेट दिली. मुंबईत पोहोचल्यानंतर आकाश फुंडकर यांनी कामगार मंत्री म्हणून सूत्र स्वीकारली. त्यानंतर त्यांनी तातडीने कामगारांच्या कल्याणासाठी असलेल्या योजना व्यापकपणे राबविण्याचे आदेश दिले. कामगारांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करू नका, असे आदेश त्यांनी दिले.

योग्य ती काळजी घ्या

कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. कामगारांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असते. त्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागतो. त्यांच्या कुटुंबातील पाल्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे गरीब कामगारांची अडवणूक होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश फुंडकर यांनी दिले. आकाश फुंडकर हे स्वतः वकील असल्याने कामगार कायद्यांची जाणीव त्यांनी अधिकाऱ्यांना करून दिली. कामगार विषयक कायद्यांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही त्यांनी सुचवले. बाल कामगारांचा वापर आणि त्यांचे शोषण यावरही लक्ष ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!