महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : आता दीड हजार नाही, पाचशेत काम भागवा

Maharashtra : सरकारच्या निर्णयावर लाडक्या बहिणींची नाराजी

Author

निवडणूकीपूर्वी गाजवलेली लाडकी बहिण योजना आता कपातीच्या सावटाखाली आली आहे. महिलांच्या सक्षमीकरणाचे वचन आता विसंगतीत अडकले आहे. लाखो लाभार्थिनींचे स्वप्न अर्धवट राहिले आहे.

विधानसभा निवडणूकीपूर्वी मोठ्या गाजावाजात जाहीर झालेली लाडकी बहिण योजना आता अडचणीत आली आहे. महिला सक्षमीकरणाचा गाजावाजा करत महायुती सरकारने ही योजना जाहीर केली होती. मात्र, आता या योजनेच्या लाभार्थ्यांपैकी तब्बल आठ लाख महिलांना दरमहा मिळणारे अर्थसहाय्य अर्ध्यावर आले आहे. आधी मिळणारे दीड हजार रुपये आता केवळ पाचशे रुपयांवर घसरले आहे. अनेक महिलांचे यावरून मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.

सरकारच्या इतर योजनांमधून लाभ घेणाऱ्या महिलांना एकाचवेळी अनेक योजना लागू न करता कपात केली जात असल्याचे कारण पुढे आले आहे. विशेषतः नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना आता लाडकी बहिण योजनेतून संपूर्ण रक्कम नाकारण्यात आली आहे. महिलांना फक्त 500 रुपये देण्यात येणार आहेत. यामुळे महिलांमध्ये नाराजी वाढत आहे आणि ही योजना निवडणूकीआधीचा केवळ आश्वासक गाजावाजा होता, असेही बोलले जात आहे.

Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या घराघरात सौरशक्तीचा प्रकाश

शेतीसाठी मदत

नमो शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत महिलांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात. त्यात केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेतूनही सहा हजार रुपये मिळतात. म्हणजे एकूण वार्षिक 12 हजार रुपयांचा लाभ या महिलांना मिळतो. मात्र, याच कारणास्तव लाडकी बहिण योजनेतील रक्कम कमी करण्यात आली आहे.

आता महिलांना वर्षभरात फक्त सहा हजार रुपये म्हणजेच दरमहा 500 रुपये मिळतील. यामुळे अनेक गरजू महिलांना मोठा फटका बसणार आहे. शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या योजनांमध्ये महिलांना समाविष्ट करून त्यांच्या इतर हक्कांवर गंडा घालण्याची ही प्रक्रिया अस्वस्थ करणारी आहे.

Nitin Gadkari : गडकरींचा रोडमॅप; टोलही स्मार्ट, रस्तेही फास्ट

तोट्याचं प्रशासन

महायुती सरकारने जाहीर केलेल्या योजनांचा लाभ वंचितांपर्यंत पोहोचवण्याऐवजी त्याच योजनांमधील लाभार्थ्यांना कपातीचा फटका दिला जातो आहे. प्रशासनाचा हा निर्णय निवडणूकीच्या तोंडावर घेतला जात असल्यामुळे, महिलांच्या सक्षमीकरणाची घोषणा केवळ प्रचारकी युक्ती ठरल्याचे स्पष्ट होते.राज्यातील महिलांना सन्मान व सुरक्षा देण्याच्या वचनामागे अशी कपात लपलेली असेल, तर ती योजना लोकाभिमुख नव्हे तर केवळ निवडणूकाभिमुख ठरते.

सरकारकडून सुरू असलेल्या एकत्रित लाभ धोरणामुळे एकाच घरातल्या व्यक्तींचे वेगवेगळ्या योजनांवरील लाभही आता संकुचित होणार आहेत.लाडकी बहिण योजना ही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचे प्रतीक ठरणार होती. पण अंमलबजावणीतील अडथळे आणि कपातीचे तंत्र योजनेच्या मूळ हेतूलाच हरताळ फासणारे ठरत आहे. निवडणूकीपूर्वी दिलेले वचन आणि अंमलबजावणीतील विसंगती यामुळे लाडकी बहिण योजना केवळ नावेच लाडकी राहणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!