महाराष्ट्र

Nana Patole : आणखी किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहायच्या सरकारला

Bhanadra : लाखांदूरमध्ये कर्जबाजारी बळीराज्याचा टोकाचा निर्णय

Post View : 37

Author

लाखांदूरमध्ये कर्जाच्या ओझ्याने थकलेल्या शेतकऱ्याने जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा आक्रोश नाना पटोले यांनी विधिमंडळात धडाडून मांडला. 

महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या राजकीय गदारोळाने गाजत आहे. विरोधक सतत सरकारला धारेवर धरत आहेत. अनेक ज्वलंत मुद्द्यांवर प्रश्न विचारले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आक्रमकपणे उपस्थित केला आहे. अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर, त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी कोणतीही ठोस मदत नसल्याचा आरोप काँग्रेसने केला.

राज्यातील एका शेतकऱ्याने कर्जाच्या ओझ्यामुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी ही बाब विधिमंडळात मांडत, सरकारला थेट सवाल केला ‘आणखी किती शेतकऱ्यांचे बळी गेल्यावर सरकारला जाग येणार आहे?

Nagpur Riot : युनूस हाफीजच्या इमारतीवर प्रशासनाचा हातोडा

पीक उद्ध्वस्त

भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील सोनी गावातील एका शेतकऱ्याने कर्जाच्या ओझ्याने थकून २२ तारखेला पहाटे पाच वाजता विष प्राशन करून आत्महत्या केली. अवघ्या दोन एकर शेती असलेल्या या शेतकऱ्याने खरीप हंगामात धानाची लागवड केली होती. मात्र, अतिवृष्टी आणि महापुरामुळे संपूर्ण पीक उद्ध्वस्त झाले.

संकटात सरकारकडून मदतीचा एकही हात पुढे आला नाही. पिकाचा नुकसानभरपाई मिळाली नाही, आणि बँकांचे कर्ज फेडण्याची कोणतीही व्यवस्था झाली नाही. आर्थिक संकटाने गांजलेल्या या शेतकऱ्याने अखेर टोकाचा निर्णय घेतला. ही घटना म्हणजे राज्यातील दयनीय शेतकरी परिस्थितीचे एक ज्वलंत उदाहरण आहे.

चौकशीची मागणी

महाराष्ट्रात दररोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. ना कर्जमाफी आहे, ना योग्य हमीभाव. दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईत शेती तोट्याचा व्यवहार बनली आहे. अशा परिस्थितीत सरकार फक्त घोषणा करत आहे, पण प्रत्यक्ष मदतीसाठी शेतकरी हताश आहेत, असा आरोप केला जात आहे.

नाना पटोले यांनी सरकारला धारेवर धरत विचारले ‘शेतकरी जगला पाहिजे की नाही, यावर सरकारची भूमिका स्पष्ट आहे का? सरकारला आणखी किती शेतकऱ्यांचे बळी लागणार आहेत कर्जमाफीसाठी?’ काँग्रेसने या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. सरकारने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

पुरामुळे मोठ्या प्रमाणात शेती उद्ध्वस्त झाली. तरीही, नुकसान भरपाईसाठी सरकारकडून कोणतीही ठोस मदत मिळालेली नाही. संपूर्ण वर्षभर घर चालवायचे कसे? कर्ज फेडायचे कसे? या तणावात शेतकरी आत्महत्या करत आहेत, असाही आरोप पटोले यांनी केला आहे.

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित यांनी अनेक वर्ष सकाळ माध्यम समूहासोबत रिपोर्टर म्हणून काम केलं. साम टिव्हीचे ते रिपोर्टर होते. याशिवाय सरकारनामा या सकाळ समूहाच्या राजकीय वेब पोर्टलचे प्रतिनिधी देखील होते.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!