
भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी नेहमीच पक्षासाठी एकनिष्ठा दाखवली आहे. त्यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांना बळ मिळाले आहे. डॉ. फुके यांच्या परिश्रमाचे फलित म्हणून हजारोच्या संख्येने कार्यकर्ते भाजपमध्ये सामील झाले आहेत.
भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी विदर्भातील भंडारा, गोंदिया या दोन्ही महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये भाजपची पाळंमुळं घट्ट करण्यासाठी दिवसरात्र एक केला. प्रचंड मेहनत घेतली. या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री असताना त्यांनी इतकं भरीव काम केलं की, त्यांच्यामुळे जिल्ह्यामध्ये महायुतीचा, विशेषतः भाजपचा गड मजबूत झाला. लोकसभा निवडणुकीत देखील याचा प्रत्यय आला. विधानसभा निवडणुकीत या दोन्ही जिल्ह्यांमध्ये भाजपला मोठ यश मिळालं.
डॉ. परिणय फुके हे नेहमीच कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वात असंख्य तरुणांनी राजकारणात सकारात्मक पाऊल टाकले आहे. त्यांनी अनेक विकास कामांमधून भंडारा-गोंदिया जिल्ह्याला एक नवी दिशा दिली आहे. त्यांची सामाजिक जाणिव आणि ठाम राजकीय भूमिका नेहमीच कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

Devendra Fadnavis : एमआयडीसी गावांना मिळणार औद्योगिक शहराचा दर्जा
सोनेरी पर्व
गोंदियात 5 एप्रिल रोजी पार पडलेला नवेगावबांध येथील कार्यकर्ता मेळावा आणि पक्ष प्रवेश सोहळा गोंदिया जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात सोनेरी पर्व ठरला. माजी मंत्री तथा आमदार डॉ. परिणय फुके यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षांत गोंदिया जिल्ह्यात भाजपचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
कार्यकर्त्यांच्या मनात असलेला विश्वास, त्यांची एकनिष्ठा आणि डॉ. फुके यांच्या मार्गदर्शनातील स्पष्टता यामुळेच आज भाजपमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते सामील झाले आहेत. कार्यक्रमाने जिल्ह्यातील जनतेच्या मनात नवचैतन्य निर्माण केले. एक हजार कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. डॉ. परिणय फुके यांच्या परिश्रमाचे फलित म्हणून मोठ्या संख्येने भाजपात पक्षप्रवेश झाला आहे. त्याचे परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत नक्कीच दिसणार आहेत.
प्रगतीच्या शिखराकडे
आमदार डॉ. परिणय फुके सोहळ्याला उद्देशून म्हणाले की, भाजप ही केवळ राजकीय संघटना नाही, ती एक विचारधारा आहे. राष्ट्रसेवेची, समाज परिवर्तनाची आणि विकासाच्या नव्या वाटचालीची. डॉ. फुके यांनी पुढे नमूद केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारत आणि महाराष्ट्र हे प्रगतीच्या नव्या शिखरांवर पोहोचत आहे. अशा ऐतिहासिक काळात भाजपमध्ये सामील होणं, ही एक गर्वाची बाब आहे.
गोंदिया जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलवणाऱ्या या सोहळ्यात उपस्थित असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहत होता. भाजपा कार्यकर्त्यांची वाढती संख्या आणि त्यांची संघटनेप्रती असलेली निष्ठा, हेच सिद्ध करते की गोंदिया जिल्ह्यात भाजपची पाळंमुळे अधिक घट्ट झाली आहे. कार्यकर्त्यांना आवाहन करत डॉ. परिणय फुके म्हणाले की, आपण सर्वजण एकत्र येऊ, संघटित राहू. विजय निश्चित करू. हिच भाजपची ताकद आहे. पक्ष प्रवेशाचा सोहळा म्हणजे नवा अध्याय, नवी उमेद आणि विकासाच्या दिशेने टाकलेले ठोस पाऊल आहे.डॉ. फुके यांनी पक्षात आलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले. भाजप कुटुंबात सर्वांना विकास आणि राष्ट्रभक्ती बघायला मिळेल, असंही ते म्हणाले.