महाराष्ट्र

Raju Karemore : स्वत:च्या सरकारमधील विभागांनाच केलं आरोपी

Sand Mafiya : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारानं पाठवलं अजब पत्र

Share:

Author

भंडारा जिल्ह्यातील वाळू माफियांना टार्गेट करताना महायुती सरकारमधील आमदारानं चक्क स्वत:च्याच सरकारमधील सर्व विभागांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून वाळू माफियांचा मुद्दा भंडारा-गोंदिया जिल्ह्यात ऐरणीवर आहे. मोहाडी तालुक्यातील अनेक गावांत रेतीचे डेपो आहेत. हे डेपो चालवणारे ठेकेदार म्हणजे नावापुरते मालक असल्याचा आरोप आमदार राजू कारेमोरे यांनी केला आहे. खरा खेळ एका वेगळ्याच पद्धतीनं रंगत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. सगळे नियम धाब्यावर बसवून कायद्याच्या नावानं बोंब मारली जात असल्याचं कारेमोरे यांचं म्हणणं आहे. अवैधपणे हे सगळे घाट सुरू आहेत. हे चालवतोय कोण असा सवाल कारेमोरे यांनी केला आहे.

आमदार कारेमोरे यांनी आपल्यास सरकारीमधील खनिज अधिकारी, महसूल कर्मचारी आणि त्यांच्या खास माणसांना आरोपीच्या कठड्यात उभं केलं आहे.‘बाप मोठा ना भाऊ, सगळं काही आपणच खाऊ’ असा प्रकार भंडारा-गोंदियात सुरू असल्याचा त्यांचा आरोप आहे. कोतवालापासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत, पोलिस शिपायांपासून गृहमंत्र्यांपर्यंत सगळ्यांची वाटणी ठरलेली आहे, असंही कारेमोरे यांनी तहसीलदारांना पाठविलेल्या पत्रात लिहिलं आहे. त्यामुळं सरकारमध्ये बसून आमदार राजू कारेमोरे आपल्याच पक्षाचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनाही खडे बोल सुनावत असल्याचं दिसत आहे. पत्र लिहिताना आपण आपल्याच सरकारच्या विरोधात काय लिहितोय, याचं भानही आमदार कारेमोरे यांना राहिल्याचं दिसत नाही.

Mahayuti : कोकाटेंची ‘बिग बॉस वाइल्ड कार्ड एन्ट्री’

वाचाल तर वाचाल

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वाचाल तर वाचाल असं सांगितलं होतं. मात्र आमदार राजू कारेमोरे यांनी तहसीलदारांना पाठविलेलं पत्र स्वत: वाचलं की नाही असा प्रश्न उपस्थित होते आहे. वाचलं असतं तर जिल्हाधिकाऱ्यांपासून गृहमंत्र्यांपर्यंत सगळ्यांचे हफ्ते ठरले आहेत, असं लिहिलं गेलं नसतं. माफियांचे चेले-चपाटे उघड उघड सांगत फिरतात की, आमच्यावरती सरकारचं कवच आहे, असंही कारेमोरे यांनी लिहिलं आहे. त्यामुळं कारेमोरे हे सरकारच्या बाहेर आहेत का‌? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी विरोधकांच्या आंदोलनात सहभाग घेतला. विधिमंडळात भाजपच्या विरोधातील फलक हाती धरून ते उभे होते. त्यांच्यानंतर आता आमदार राजू कारेमोरे यांचं हे पत्र पुढं आलं आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या सोबत राहायचं आणि दादांनाच अडचणीत आणायचं असा चंग तर काही नेत्यांनी बांधलेला नाही ना‌? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!