उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सध्या जिल्हा पातळीवर अंतर्गत वाद आणि गटबाजी सुरू आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या गोटात सध्या शांतते ऐवजी ‘तंगडी मध्ये लंगडी’चे वातावरण आहे. राजकारणाच्या रणभूमीवर नेहमीच आक्रमक असलेला हा पक्ष आता अंतर्गत मतभेदांमुळे स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडताना दिसते आहे. एक नेतृत्व अशी ओळख असलेल्या या पक्षात आता प्रत्येक जिल्ह्यात वेगळाच नाटकाचा प्रयोग सुरू आहे. कोणताही जिल्हा घ्या, प्रत्येक जिल्ह्यतील शिंदेंच्या शिवसेनेत अंतर्गत वाद सुरू असल्याचे दिसून येत आहे. नागपूर जिल्हा देखील या परिस्थितीपासून दूर राहू शकला नाही.
नागपूर जिल्ह्यात सध्या सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. मात्र संपूर्ण सहा मतदार संघासाठी शिवसेनेतील एकच जिल्हाध्यक्ष नेमला गेला आहे. यासाठी आता शिवसेनेच्या अंतर्गत गोटातून रस्सीखेच सुरू आहे. परंतु शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये मतभेद सुरू असल्याने अद्यापही शिवसेनेचा जिल्हाप्रमुख नेमण्यात आलेला नाही. त्यामुळे सर्व कारभार ‘राम भरोसे’ सुरू आहे. ही स्थिती केवळ नागपुर पुरती मर्यादित नाही. सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्वच जिल्ह्यात शिवसेनेमध्ये प्रचंड रस्सी खेच बघायला मिळत आहे.
Ashish jaiswal : राज्यमंत्र्यांनी विधानसभेत सादर केला कृषी क्षेत्राचा रिपोर्ट कार्ड
नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे
अकोला जिल्हा देखील यापासून वंचित राहू शकला नाही. अकोला जिल्ह्यातील आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या विरोधात शिंदेंच्या शिवसैनिकांनी थेट बंड पुकारले आहे. उपमुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे पक्षाकडे फारसं लक्ष नाही अशी ओरड आता होत आहे. राज्यात सध्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचे वारे जोरात वाहू लागले आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर चार ते पाच वर्षानंतर राज्यात महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला आहे.
निवडणुकीसाठी राज्यातील प्रत्येक राजकीय पक्ष आता निवडणुकीच्या तयारीसाठी मैदानात उतरलेला दिसत आहे.मात्र निवडणुकीच्या या पार्श्ववभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जर पक्षातीलच नेते एक दुसऱ्यांवर धनुष्यबाण ताणत असतील तर पक्षाचे काय होणार अशी चिंता आता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना लागली आहे. यामुळे पक्षांतर्गत मतभेद याकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी वेळीच पक्षाकडे लक्ष देणे आता गरजेचे झाले आहे नाहीतर शिवसेनेचा दनुष्याची वाताहत झाल्याशिवाय राहणार अशी चर्चा आता शिवसेनेमध्ये सुरू आहे.
Vishwa Hindu Parishad : औरंगजेबाच्या कबरीवरून पेटलेला वाद विझला