महाराष्ट्र

Election Commission : स्थानिक निवडणुकीत व्हीव्हीपॅटचे तिकीट रद्द

Maharashtra : राजकीय रणधुमाळीत टप्प्याटप्प्याने मतदानाची मॅरेथॉन

Author

महाराष्ट्रात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये टप्प्याटप्प्याने मतदान होणार असल्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी रंगणार आहे मोठा डाव. दिवाळीनंतर राज्यातील मनपा, जिल्हा परिषद आणि नगपालिका यांच्यात टप्प्याटप्प्याने निवडणूक होणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. यामुळे पक्षांनी आपली कंबर कसली आहे. निवडणुकीचे वारे आता अधिक वेगाने वाहू लागले आहेत. मात्र यंदा निवडणुकीच्या प्रक्रियेत एक महत्त्वाचा बदलही जाणवणार आहे. तो म्हणजे व्हीव्हीपॅट मशीनचा वापर होणार नाही, असा निर्णय आयोगाने घेतल्याची माहिती दिली आहे.राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या मते, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अवघ्या सहा वर्षांनंतर ही निवडणूक होणार आहे. परंतु, ही निवडणूक एकाचवेळी घेणे शक्य नसल्यामुळे टप्प्याटप्प्याने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विशेष म्हणजे नाशिक विभागात 50 लाखांहून अधिक मतदार आहे.  जवळपास 4 हजार 882 मतदान केंद्रांवर 8 हजार 705 कंट्रोल युनिट्स आणि 17 हजारांहून अधिक मतदान यंत्र वापरण्याची गरज आहे. हे लक्षात घेता, मनुष्यबळाची कमतरता उद्भवू नये म्हणून ही निवडणूक विभागांनुसार टप्प्याटप्प्याने घेतली जाणार आहेत. मात्र, कोणत्या संस्थेची निवडणूक आधी होणार हे अजून ठरलेले नाही. राज्य निवडणूक आयुक्तांनी ओबीसी आरक्षणासाठी नव्या लॉटरी सिस्टीमचा वापर होणार असल्याचाही खुलासा केला. अनुसूचित जाती-समाजांसाठी आरक्षण निश्चित असून ओबीसींसाठी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार लॉटरी पद्धत अवलंबली जाते. मागील निवडणुकीतही हाच नियम पाळण्यात आला होता. यंदाही तोच नियम लागू करण्यात येणार आहे.

Shalartha ID Scam : भ्रष्टाचाराची सिरीज चंद्रपूरातही रिलीज

आरक्षणासाठी लॉटरी पद्धत

1 जुलै 2025 पर्यंतच्या मतदार यादीच्या आधारे ही निवडणूक होणार आहे.  त्यानुसार पुढील नियोजन केले जाईल. सर्वात मोठा बदल म्हणजे आगामी निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशीन वापरला जाणार नाही, असेही दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले. गेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकींदरम्यान विरोधी पक्षांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील मतांची जुळवणी होण्याची मागणी केली होती. परंतु या निवडणुकीत व्हीव्हीपॅट न वापरण्याचा निर्णय घेतल्यामुळे यावरून मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे मतदार आणि पक्षकारांमध्ये मतमंथन होण्याची शक्यता दिसून येत आहे. व्हीव्हीपॅट मशीन कसे काम करते, याबाबत माहिती देताना समजते की, मतदार जेव्हा EVM मशीनवर उमेदवाराचा बटन दाबतो, तेव्हा त्या उमेदवाराचे नाव, क्रमांक व चिन्ह असलेली स्लिप काही सेकंद दाखवली जाते.

स्लिप नंतर आपोआप कट होऊन सुरक्षितपणे संकलित केली जाते. त्यामुळे मतदारांना त्यांचे मत योग्य उमेदवाराला गेले याची खात्री करता येते. मात्र, यंदा ही खात्री व्हीव्हीपॅटशिवाय कशी होणार, हा प्रश्न उभा राहिला आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा हा टप्प्याटप्प्याने होणारा कार्यक्रम महाराष्ट्रातील राजकारणात नवीन वळण ठरणार आहे, यात शंका नाही. पक्षांनी वेगवेगळ्या मोर्च्या बांधून, उमेदवार निवडून, प्रचार-प्रसारात जोरदार सुरुवात केली आहे. आता या निवडणुकीत ईव्हीएम व व्हीव्हीपॅटच्या वापरावरून निर्माण होणाऱ्या वादांना देखील निराकरण शोधावे लागणार आहे. महाराष्ट्र निवडणूक आयोगाची तयारी, नवीन आरक्षण पद्धती आणि टप्प्याटप्प्याने मतदानाचा निर्णय यामुळे या निवडणुकीत रसिकांच्या आणि राजकारणातील सर्व घटकांच्या नजरेत सतत लक्ष केंद्रीत राहणार आहे. पुढील महिन्यांत या निवडणुकीच्या अधिकृत तपशीलांबाबत आणखी खुलासे होण्याची अपेक्षा आहे.

Nagpur : शेतकऱ्याचा जेसीबी गेला अन् मनसेचा रोष बँकेत उफाळला

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!