महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : निवडणूक आयोगाला का लागते भाजपचा शेल्टर?

Maharashtra : मत चोरीच्या आरोपणाने राज्याच्या राजकारणात खळबळ

Author

काँग्रेसचे राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मतचोरीचे गंभीर आरोप करत भाजप आणि निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे.

2024 लोकसभा निवडणुकीत झळकलेली काँग्रेसची पताका अनेक राज्यांमध्ये लहरताना दिसली होती. मतदारांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिल्याने काँग्रेसच्या गोटात उत्साहाचे  वातावरण होते. मात्र, महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल लागल्यावर चित्रच पालटलं. महायुतीने महाविकास आघाडीला मागे टाकत पुन्हा एकदा सत्ता काबीज केली. ज्यामुळे काँग्रेसच्या चेहऱ्यावर विजयाचा हसू विरले. ही उलथापालथ इतकी गोंधळात टाकणारी होती की, काँग्रेसकडून थेट मतचोरीचे आरोप होत गेले. 7 ऑगस्ट रोजी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर थेट बोट ठेवत एक गंभीर दावा केला.

महाराष्ट्र व कर्नाटकमधील मतदार यादीत लाखो बनावट नावे आढळली आहेत, ज्यामुळे निवडणुकीचा कौल चुकीच्या दिशेने गेला. या आरोपांची राजकीय वळवळ सुरू असतानाच महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आक्रमक झाले. त्यांनी भाजपवर आणि मुख्यमंत्र्यांवर ताशेरे ओढत थेट सवाल केला, निवडणूक आयोगाला प्रश्न विचारल्यावर भाजपला एवढ्या मिरच्या का झोंबतात? वडेट्टीवार यांनी भाजपच्या प्रतिक्रियेतील अस्वस्थता हेरत ताशेरे ओढले. ते म्हणाले, राहुल गांधींनी मतचोरीवर प्रश्न उपस्थित करताच मुख्यमंत्री इतके संतापले की त्यांनी अश्लील भाषेचा वापर केला.

Devendra Fadnavis : सत्तेच्या पराभवाचे सत्य कडवट वाटते

सत्तासंघर्षाचा नवीन टप्पा

अर्थ स्पष्ट आहे, ही मतचोरी संगनमताने केली गेली का? वडेट्टीवार यांचे आरोप यावरच थांबले नाहीत. त्यांनी आणखी गंभीर प्रश्न उपस्थित केले. निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित झाला असताना भाजप नेत्यांनी एवढी धावपळ का केली? आयोग स्वतः उत्तर का देत नाही? की त्यांना भाजपकडून ‘क्लिन चीट’ची गरज भासते? या वक्तव्यांनी राजकीय वातावरण तापले असून काँग्रेसच्या या आक्रमक पवित्र्यामुळे सत्ताधाऱ्यांची चवाळी सुरू आहे. वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून म्हटले की, राहुल गांधी विरोधात असभ्य भाषा वापरून मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिलं की, ‘कुंपणच शेत खात आहे’.

आरोपांना प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, पराभव पचवता आला नाही की विरोधक अशा प्रकारे बिनबुडाचे आरोप करत सुटतात. मात्र, राजकीय नैतिकता म्हणते की, सत्य स्वीकारणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा नवा अध्याय मतचोरीच्या आरोपांमुळे सुरू झाला आहे. काँग्रेसने हा मुद्दा चोख पद्धतीने उचलत आता सत्ताधाऱ्यांवर लोकशाहीचे अपहरण केल्याचा ठपका ठेवला आहे. तर भाजपकडून हे सर्व आरोप निव्वळ पराभवातून आलेली चीड म्हणून फेटाळले जात आहेत.

Navneet Rana : माजी खासदारांना जीवघेणा संदेश

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!