देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली नागपूरचा विकास वेग घेतोय. सौरऊर्जेच्या नव्या युगाची मुहूर्तमेढ IIM नागपूरमध्ये रोवली गेली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर आयआयएम कॅम्पसमध्ये दोन मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी केली. हा प्रकल्प संस्थेला नेट झिरो कॅम्पस बनविण्याच्या दिशेने मोठे पाऊल आहे. सौरऊर्जेच्या मदतीने संपूर्ण कॅम्पस स्वच्छ आणि हरित ऊर्जा वापरणारा ठरणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याच्या भविष्यातील ऊर्जा धोरणाविषयी भाष्य करताना २०३० पर्यंत राज्यातील बावन्न टक्के ऊर्जा उत्पादन हे अपारंपरिक स्रोतांमधून केले जाईल, असे स्पष्ट केले. यासोबतच, त्यांनी आयआयएम परिसरातील गोल्फ अकादमीच्या नव्या प्रकल्पाचाही शुभारंभ केला.
Maharashtra : महायुतीची ‘बजेट मुव्ही’ दुपारी दोन वाजता विधिमंडळाच्या पडद्यावर
विकासाचे नवे उच्चांक
फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले की, पूर्वी महत्त्वाचे प्रकल्प प्रथम पुण्यात सुरू होत असत आणि त्यानंतर नागपूरला संधी मिळत असे. मात्र, आता हा क्रम बदलला असून नागपूर प्रथम प्रगतीच्या दिशेने पुढे जात आहे आणि त्यानंतर इतर शहरांचा नंबर येतो. यामुळे नागपूरच्या वाढत्या प्रगतीबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.2014 ते 2019 या त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात नागपुरात मेट्रो, आयआयएम, एम्स, ट्रिपल आयटी, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या शैक्षणिक आणि पायाभूत सुविधा सुरू करण्यात आल्या. या सर्व प्रकल्पांमुळे नागपूर शिक्षण आणि विकासाच्या केंद्रस्थानी आले आहे.
सौरऊर्जेमुळे उत्तम पर्यावरण
नागपूर आयआयएमचा हा सौरऊर्जा प्रकल्प संपूर्ण कॅम्पसच्या वीजेची गरज भागवेल. यामुळे संस्थेचा कार्बन फूटप्रिंट मोठ्या प्रमाणावर कमी होईल आणि निसर्गस्नेही ऊर्जा प्रणालीचा आदर्श निर्माण होईल. महाराष्ट्र सरकारच्या हरित ऊर्जेच्या धोरणाला हे आणखी एक यशस्वी पाऊल ठरणार आहे.मुख्यमंत्र्यांनी राज्यातील इतर महत्त्वाच्या शैक्षणिक आणि औद्योगिक केंद्रांमध्येही हरित ऊर्जेचा प्रसार करण्याचे उद्दिष्ट स्पष्ट केले. सौरऊर्जा, पवनऊर्जा आणि जलऊर्जा यांचा समतोल राखून महाराष्ट्र लवकरच देशातील सर्वात मोठ्या हरित ऊर्जाधारित अर्थव्यवस्थांपैकी एक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Chandrapur : उपमुख्यमंत्री शिंदेनंतर आता काँग्रेस नेत्यावर हल्ला
राष्ट्रीय स्तरावर महत्व
नागपूर आता केवळ महाराष्ट्राचे केंद्र नाही तर राष्ट्रीय स्तरावर एक प्रमुख शैक्षणिक आणि औद्योगिक हब म्हणून ओळखले जात आहे. आयआयएम, एम्स आणि अन्य राष्ट्रीय संस्थांमुळे शहराला वेगळी ओळख मिळत आहे. मुख्यमंत्र्यांनी या विकास प्रक्रियेला गती देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचे सांगितले. नागपूर आणि संपूर्ण महाराष्ट्र अधिक मजबूत, हरित आणि तंत्रज्ञानप्रधान भविष्यासाठी सज्ज होत आहे.