प्रशासन

Maharashtra Government : नागपूर विभागाला मोठा ‘अर्थ’लाभ

Nagpur : कामगार विभागाकडून कामगारांच्या पाल्यांसाठी मोठे सहाय्य

Post View : 57

Author

महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागामार्फत नोंदणीकृत कामगारांना विविध कल्याणकारी योजनांचे लाभ थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने दिले जातात. यामध्ये कामगारांच्या पाल्यांना शैक्षणिक सहाय्य तसेच 10वी व 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहनपर अर्थसहाय्य प्रदान करण्यात येते.

महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागामार्फत नोंदणीकृत कामगारांना शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक योजनांचे लाभ थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने दिले जातात. या योजनेंतर्गत कामगारांच्या पाल्यांना शैक्षणिक सहाय्य मिळते. जानेवारी ते डिसेंबर 2024 या कालावधीत शाळकरी विद्यार्थ्यांसाठी तसेच 10वी व 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहनपर रक्कम देण्यात आली आहे. यासाठी राज्य शासनाने तब्बल 17 कोटी 72 लाख 76 हजार रुपयांचे अर्थसहाय्य वितरित केले आहे.

राज्य शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगार नियम, 2007 अंतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना केली. या मंडळाच्या माध्यमातून राज्यभरातील कामगारांची नोंदणी करण्यात येते व विविध कल्याणकारी योजनांचे लाभ पुरविले जातात. या योजनांतर्गत नोंदणीकृत कामगारांना शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक व आरोग्यविषयक योजनांचे लाभ थेट DBT पद्धतीने मिळतात. कामगारांना अत्यावश्यक संच, सुरक्षा संच व गृहोपयोगी वस्तू संच वितरीत करण्यात येतात.

Shiv Sena : दक्षिण नागपुरात ताकदीचा विस्तार 

कोट्यवधींचे शैक्षणिक सहाय्य

नागपूर विभागात 23 हजार पेक्षा जास्त कामगारांच्या पाल्यांना 8 कोटींपेक्षा जास्त शैक्षणिक सहाय्य मिळाले आहे. इयत्ता 1 ली ते 7 वीतील विद्यार्थ्यांसाठी शाळेतील किमान 75% हजेरी असल्यास दरवर्षी 2 हजार 500 रूपये शैक्षणिक सहाय्य दिले जाते. इयत्ता 8 वी ते 10 वीतील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी 6 हजार रूपये शैक्षणिक सहाय्य. या योजनेंतर्गत नागपूर विभागातील एकूण 23 हजार 632 कामगारांच्या पाल्यांना 8 कोटी 35 लाख 56 हजार रुपये शैक्षणिक सहाय्य मिळाले आहे.

नागपूर जिल्हयातील 7 हजार 281 लाभार्थींना दोन कोटी 53 लाख 50 हजार, वर्धा जिल्ह्यातील 11 हजार 681 लाभार्थींना चार कोटी 20 लाख 45 हजार, भंडारा जिल्ह्यातील 337 लाभार्थींना 11 लाख 32 हजार 500, गोंदिया जिल्ह्यातील एक हाजार 959 लाभार्थींना 69 लाख 60 हजार, चंद्रपूर जिल्ह्यातील 196 लाभार्थींना 6 लाख 90 हजार, गडचिरोली जिल्ह्यातील 2 हजार 178 लाभार्थींना 73 लाख 87 हजार 500 रूपये अनुदान प्राप्त झाले आहे.

Shiv Sena : विरोधकांवर सोडलेला ‘आइस’ थंड झाला?

कामगारांच्या इयत्ता 11 वी व 12 वीतील पाल्यांना शिक्षणासाठी 7 कोटींपेक्षा अधिक शैक्षणिक सहाय्य वितरीत करण्यात आले आहे. कामगारांच्या 10 वी व 12 वी उत्तीर्ण पाल्यांना किमान 50% किंवा अधिक गुण मिळाल्यास 10 हजार प्रोत्साहनपर सहाय्य दिले जाते. या योजनेंतर्गत विभागातील दोन हजार 179 विद्यार्थ्यांना दोन कोटी 17 लाख 90 हजार रुपये प्रोत्साहन शैक्षणिक सहाय्य देण्यात आले आहे. नागपूर जिल्ह्यातील 398 विद्यार्थ्यांना 39 लाख 80 हजार रुपये प्रोत्साहन सहाय्य प्रदान करण्यात आले आहे.

कुटुंबांना दिलासा

कामगार विभागाच्या या योजनांमुळे हजारो कामगार कुटुंबांना मोठा दिलासा मिळत आहे. शासनाच्या या उपक्रमामुळे कामगारांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी मदत मिळत आहे. तसेच थेट DBT पद्धतीमुळे आर्थिक मदत योग्य प्रकारे आणि वेळेवर पोहोचत आहे. कामगार कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी कामगारांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. कामगारांनी कामगार कल्याण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा स्थानिक कामगार कार्यालयात जाऊन अर्ज करावा.

महाराष्ट्र शासनाच्या या योजनांमुळे कामगार कुटुंबांच्या मुलांना शिक्षणासाठी मोठी मदत मिळत असून, भविष्यात अशा योजनांचा लाभ आणखी वाढविण्याचा शासनाचा मानस आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!