
पूर्व विदर्भातील माजी मालगुजारी तलावांना नवसंजीवनी देण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा ऐतिहासिक निर्णय घेतला गेला आहे. या निर्णयामुळे तलाव खोलीकरणाच्या कामांना वेग मिळणार असून, शेतकऱ्यांना सिंचनासाठी शाश्वत पाणी उपलब्ध होणार आहे.
राज्य सरकारने पूर्व विदर्भातील ऐतिहासिक माजी मालगुजारी तलावांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा नर्णय प्रत्यक्षात आला आहे. शासनाने अधिकृत शासन निर्णय (जीआर) जारी करत तलाव खोलीकरणासाठी काढण्यात येणाऱ्या गाळावर कोणतेही स्वामित्वधन (रॉयल्टी) लागू होणार नाही, असे जाहीर केले आहे. या निर्णयामुळे जलस्रोत पुनरुज्जीवनाच्या कार्याला नवी दिशा मिळणार आहे. शेतकऱ्यांना सिंचनासाठी शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे.

पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूरच्या पूर्व भागासह मराठवाड्यातील नांदेड व अमरावती विभागातील यवतमाळ जिल्ह्यातील काही भाग पाणीटंचाईच्या समस्येने ग्रस्त आहेत. या भागांतील भूस्तर प्रामुख्याने रूपांतरीत खडक (Metamorphic Rock) प्रकारचा असल्याने पावसाचे पाणी फार काळ टिकत नाही. त्यामुळे गोंड राजांच्या काळात तब्बल 6 हजार 700 माजी मालगुजारी तलाव बांधले गेले होते. मात्र, योग्य देखभाल न झाल्याने हे तलाव गाळाने भरून सिंचन क्षमतेत मोठी घट झाली आहे.
Parinay Fuke : विषयांतर संभ्रम निर्माण करणे हीच ठाकरेंची रणनीती
जलसंपत्ती संवर्धनाचा धडाका
तलावांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आमदार डॉ. परिणय फुके यांनी राज्य शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे अखेर सरकारने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यामुळे तलाव पुनरुज्जीवनाच्या कामांना मोठी चालना मिळेल. या निर्णयामुळे जलसंधारणाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरेल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत दोन हजार 600 माजी मालगुजारी तलाव आहेत. त्यापैकी 5 हेक्टरपेक्षा अधिक बुडीत क्षेत्र असलेल्या तलावांचे वैज्ञानिक पद्धतीने खोलीकरण करण्यात येणार आहे.
शासनाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार, या तलावांमधून काढण्यात येणाऱ्या गाळावर कोणतेही स्वामित्वधन (रॉयल्टी) आकारले जाणार नाही. त्यामुळे तलाव खोलीकरणाच्या कामांना वेग मिळेल. जलसंचय क्षमतेत वाढ होईल आणि भूजल पातळी सुधारेल. तलाव खोलीकरणाद्वारे बाहेर पडणाऱ्या मातीचा उपयोग तलावाच्या किनाऱ्याच्या मजबुतीकरणासाठी तसेच गावातील सार्वजनिक ठिकाणी केला जाणार आहे. शाळांचे मैदान, क्रीडांगण यांसारख्या ठिकाणी ही माती वापरण्यात येणार असल्याने स्थानिक नागरिकांनाही या निर्णयाचा लाभ होईल. डॉ. परिणय फुके यांच्या अथक प्रयत्नांमुळे हे सर्व शक्य झाले आहे.
प्रभावी मोहीम
तलावांच्या बुडीत क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले असल्यामुळे तलावांची पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. परिणामी, पावसाळ्यात तलावाच्या बाहेर पाणी वाहून पूरस्थिती निर्माण होते. यावर तोडगा काढण्यासाठी भूअभिलेख विभागाच्या मदतीने तलावांच्या बुडीत क्षेत्राचे सीमांकन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे भविष्यात अतिक्रमणावर आळा घालणे शक्य होईल आणि तलावांचे नैसर्गिक स्वरूप कायम राहील.
ऐतिहासिक निर्णयामुळे अनेक सकारात्मक बदल घडून येणार आहेत. तलाव पुनरुज्जीवनामुळे पाणी साठवण क्षमता वाढेल. भूजल पातळी सुधारेल, ज्यामुळे विहिरी आणि नळपाणी पुरवठा योजनांना फायदा होईल. शेतकऱ्यांना सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होईल. पारंपरिक मासेमारी उद्योगाला चालना मिळेल. पूरस्थिती नियंत्रणात राहील, आणि पर्यावरण संतुलन साधले जाईल.
आनंदाचे वातावरण
राज्यातील माजी मालगुजारी तलाव पुनरुज्जीवित करण्याच्या दृष्टीने आमदार डॉ. परिणय फुके यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. त्यांच्या मागणीनुसार शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे शेती समृद्ध होईल. जलसंधारणाचे उद्दीष्ट साध्य होईल आणि ग्रामीण भागाच्या विकासाला मोठी चालना मिळेल.