महाराष्ट्र

Local Body Election : एक एक मतासाठी नेत्यांची धडपड

Election Commission : मतदानाच्या नाव नोंदणीसाठी व्यापक प्रयत्न

Author

निवडणुकीमध्ये एक एक मत महत्त्वाचा असतो याचा प्रत्यय लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्षांना आला आहे. प्रत्येक मताची किंमत जपण्यासाठी सर्व राजकीय पक्ष आता पुन्हा एकदा धडपड करत आहे.

कोणतीही निवडणूक म्हटली की एक एक महत्त्वाचा असतो. एका मताने निवडणुकीमध्ये विजय आणि पराजय होत असतो. काही काही ठिकाणी तर अगदी एक दोन तीन मतांनी उमेदवार विजयी झाल्याचे आणि पराभूत झाल्याचे बघायला मिळाले. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचा भंडारा जिल्ह्यात झालेला मिळालेला निसटचा विजय हे याचे उत्तम उदाहरण आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचा झालेला पराभव हा देखील काहीशी मतांनी झालेला होता. त्यामुळे यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये कोणतीही रिस्क घ्यायची नाही असा चंग सर्वच राजकीय पक्षांनी मांडला आहे.
.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर कोणत्याही क्षणी आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची प्रक्रिया सुरू होऊ शकते. या निवडणूक प्रक्रियेपूर्वी जे स्थानिक स्वराज्य संस्थेची मतदार यादी आहे ती निवडणूक आयोगाकडून अपडेट केली जाणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक मतदारांची नावे यादीतून गायब झाली होती. मात्र मतदारांनी शेवटपर्यंत उदासीन भूमिका दाखवल्यामुळे कोणाचे नाव कापले गेले याचे सस्पेन्स मतदानाच्या दिवशीच उघडकीस आले. यामुळे अनेकांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागले. याचा फटका लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला बसला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला बसला.

Gondia : लाचखोरीच्या रिंगणात अखेर नंदा खरपुडे आऊट 

टॅबद्वारे मतदारांची माहिती

मतदारांची नावे गहाळ झाल्यामुळे आपल्याला कोणताही फटका बसू नये याची काळजी आता महायुती आणि महाविकास आघाडी कडून घेतली जात आहे. त्यामुळे निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच मतदार यादी अपडेट करण्याचं काम आता राजकीय पक्षांनी सुरू केलं आहे. मात्र यंदा महायुती आणि महाविकास आघाडीने मतदार यादी अपडेट करण्याची पद्धत बदलली आहे. पूर्वी मतदारांकडून फॉर्म भरून घेतले जायचे आणि त्याचे पुरावे सोबत जोडून हेच हे सर्व अर्ज संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये नेऊन दिले जात होते. मात्र त्यानंतरही अनेक मतदारांची नावे यादीतून गायब झाली.

सगळा अनुभव लक्षात घेता यंदा सर्वच राजकीय पक्ष प्रत्येक नवीन मतदाराचे नाव आणि त्यांचे नाव गायब आहेत अशा सर्वांची नावे डायरेक्ट ऑनलाइन फीड करणार आहेत. यासाठी वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना टॅब आणि लॅपटॉप देण्यात आलेले आहेत. लवकरच वेगवेगळ्या प्रभागांमध्ये वॉर्डांमध्ये जिल्हा परिषदेच्या गट आणि गणांमध्ये हे कार्यकर्ते लॅपटॉप घेऊन मतदारांची नावे नोंदणी करताना दिसतील. एकही मतदार यंदाच्या निवडणुकीमध्ये मतदानापासून वंचित राहू नये असा प्रयत्न सध्या महाविकास आघा. डी आणि महायुती कडून केला जात आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला बऱ्यापैकी यश मिळवता आलं.

Mahavikas Aghadi : मातोश्रीवर राजकीय साखरपेरणी

स्थानिक निवडणुकीची प्रतिष्ठा

विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र महायुतीने महाविकास आघाडीचा सफाया केला. या दोन निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही महायुती आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची राहणार आहे. विशेष म्हणजे मुंबई महापालिकेवर आतापर्यंत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व कायम राहिले आहे. मुंबई महापालिकेतून ठाकरेंची शिवसेना संपली की, पक्ष कोलमडला अशी परिस्थिती आहे असं सांगितले जाते. त्यामुळे मुंबई ठाणे आणि मुंबई भागातील सर्व महापालिकांवर एक हाती सत्ता मिळवण्यासाठी दोन्ही शिवसेना मैदानामध्ये उतरले आहे.

यासोबतच पुणे पिंपरी चिंचवड आणि पश्चिम महाराष्ट्रातील महापालिका जिंकण्यासाठी जिंकण्याचे आव्हान साहेबांची राष्ट्रवादी आणि दादांच्या राष्ट्रवादी पुढे आहे. विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला या महापालिकेवर ताबा मिळवण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस दोघांमध्ये थेट लढत होणार आहे. अशा परिस्थितीमध्ये एक मतही आपल्याला सत्ता मिळवून देऊ शकते याची जाणीव असल्याने सर्व राजकीय पक्षाचा कंबर कसून कामाला लागले आहेत.

Supreme Court Of India : न्यायमंदिरात पहिल्या स्त्रीचा दीपपर्व

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!