महाराष्ट्र

Nagpur : ‘वोट चोरी’ वरून सत्ताधारी- विरोधकांची थेट धडक

Workers Protest : कामठीत काँग्रेस-भाजप आमने-सामने

Post View : 33

Author

कामठी शहरात काँग्रेसच्या ‘वोट चोर’ रॅलीने राजकीय वातावरणात मोठी खळबळ माजवली आहे. या रॅलीविरोधात भाजप रस्त्यावर उतरल्याने दोन्ही पक्ष आमनेसामने आले आहेत.

कामठी शहरात राजकीय आखाडा चांगलाच तापला आहे. काँग्रेस पक्षाच्या ‘वोट चोर’ रॅलीने कामठी विधानसभा क्षेत्रात नव्या वादाला तोंड फोडले आहे. या रॅलीने राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, भारतीय जनता पक्षाने याला तीव्र विरोध दर्शवत जोरदार आंदोलन छेडले आहे. काँग्रेसच्या या रॅलीने आणि त्यात वापरलेल्या आक्षेपार्ह भाषेने कामठीच्या रस्त्यांवर राजकीय तणाव निर्माण झाला आहे. ज्यामुळे दोन्ही पक्षांमधील संघर्ष आता चव्हाट्यावर आला आहे.

दोन दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाने नागपूर येथे एक भव्य रॅली काढली. या रॅलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी आणि माजी मंत्र्यांनी सहभाग घेतला. त्यांनी भाजप सरकारवर ‘वोट चोरी करणारे सरकार’ असा गंभीर आरोप करत जनतेची दिशाभूल केल्याचा दावा केला. काँग्रेसच्या या आक्षेपार्ह शब्दप्रयोगाने आणि आरोपांनी भाजप कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला. परिणामी, कामठीतील भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी रस्त्यावर उतरले आणि काँग्रेसविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला. यामुळे कामठीच्या राजकीय वातावरणात एक प्रकारची चलबिचल निर्माण झाली आहे.

Pratibha Dhanorkar : भद्रावती-वरोरात काँग्रेसची ध्वस्त अवस्था

रस्त्यावर उतरले कार्यकर्ते

कामठीतील एरखेला परिसरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने जमून काँग्रेसच्या रॅलीविरोधात आंदोलन केले. काँग्रेसने जनतेची लूट केल्याचा आरोप करत भाजपने आपला संताप व्यक्त केला. या आंदोलनात कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर जोरदार टीका करत त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. ‘वोट चोरी’ हा मुद्दा आता कामठीच्या राजकारणात केंद्रस्थानी आला आहे. यामुळे दोन्ही पक्षांमधील वैर तीव्र झाले आहे. भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या रॅलीला केवळ राजकीय खेळखंडोबा ठरवत जनतेच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न असल्याचा दावा केला आहे.

कामठीतील या राजकीय घडामोडींनी स्थानिक जनतेतही चर्चेला उधाण आले आहे. काँग्रेसच्या रॅलीने आणि त्यानंतरच्या भाजपच्या आंदोलनाने कामठी विधानसभा क्षेत्रात नव्या राजकीय समीकरणांना जन्म दिला आहे. काँग्रेसने आपल्या रॅलीद्वारे भाजप सरकारवर गंभीर आरोप करत जनतेचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला असला, तरी भाजपने याला तितक्याच ताकदीने प्रत्युत्तर दिले आहे. या दोन्ही पक्षांमधील शाब्दिक युद्ध आता रस्त्यावरच्या आंदोलनापर्यंत पोहोचले आहे. कामठीच्या जनतेत या मुद्द्यावरून मतमतांतरे दिसून येत आहे. काहींनी काँग्रेसच्या आरोपांना पाठिंबा दर्शवला, तर काहींनी भाजपच्या आंदोलनाला समर्थन दिले.

Akash Fundkar : घरचे कर्तव्य निभावून पालक जिल्ह्याचाही जपला वारसा

कामठीतील हा राजकीय तमाशा येत्या काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. ‘वोट चोरी’चा मुद्दा आता केवळ रॅली किंवा आंदोलनापुरता मर्यादित न राहता, येत्या निवडणुकींमध्येही दोन्ही पक्षांचे प्रमुख हत्यार ठरू शकतो. काँग्रेस पक्षाने या रॅलीद्वारे जनतेच्या मनात संशयाचे बीज पेरण्याचा प्रयत्न केला आहे, तर भाजपने आपल्या आंदोलनातून काँग्रेसच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या राजकीय लढाईने कामठीतील जनतेचे लक्ष वेधले आहे. येत्या काळात हा संघर्ष कोणत्या दिशेने वळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!