महाराष्ट्र

Nana Patole : धार्मिक ध्रुवीकरणाला मूकसंमतीचा आरोप

Congress : नाना पटोले भाजपवर तुटून पडले

Post View : 19

Author

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी सुरू आहेत. नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून उसळलेल्या वादाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. दोन गटांमध्ये संघर्ष उफाळल्याने नागपूरमध्ये संचारबंदी करण्यात आली आहे. या प्रकरणात अनेक पोलीस अधिकारीही जखमी झाले. मात्र, या प्रकरणावर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी थेट सरकारवर हल्लाबोल करत भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावर बोलताना नाना पटोले यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी विधिमंडळात आक्रमक भमिका घेत भाजप सरकारला धारेवर धारण धरण्याचे काम केले आहेत. त्यांनी थेट विचारले, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलच्या आंदोलनाकडे सरकारने दुर्लक्ष का केले? भाजप आमदार नितेश राणे लोकांच्या धार्मिक भावना भडकवणारी विधाने करत आहेत, त्यांच्यावर कारवाई का होत नाही? असा सवाल उपस्थित कलेला आहे.

Nagpur Riot : मुख्यमंत्र्यांनी कोणाचे डोळे काढले? काँग्रेसवर शिंदे संतप्त

मंत्र्यांवर निशाणा 

नाना पटोले यांनी सरकारच्या गुप्तचर विभागावरही प्रश्न उपस्थित केलेला आहे. जेव्हा आंदोलनं चिघळले तेव्हा गुप्तचर विभाग काय करत होता? नागपूरमध्ये इतका मोठा वाद होईपर्यंत सरकारला काहीच कसे का कळले नाही? असा सवाल करत त्यांनी फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

नाना पटोले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देखील लक्ष्य केले. काही दिवसांपूर्वी गडकरी म्हणाले होते, ‘जो जातीवाद करेल, त्याला लाथ मारून बाहेर फेकले जाईल.’ यावर पलटवार करत नाना पटोले म्हणाले, ‘नितीन गडकरी यांच्या पक्षाचे लोकच धार्मिक तेढ निर्माण करत आहेत. मग गडकरी यांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी का करत नाही? असे बोलले आहेत.

काही दिवसांपूर्वी भाजपचे मंत्री नितीश राणे यांनी महाराष्ट्र सरकारच्या मटण दुकानदारांसाठी ‘मल्हार सर्टिफिकेट’ देण्याच्या धोरणाला पाठिंबा दिलेला होता. यावरून देखील महाराष्ट्राचे वातावरण चांगलेच तापले होते. मात्र, या निर्णयावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. हिंदू समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप देखील केला गेला होता.

नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसक घटना घडल्या. दोन गटांमध्ये झालेल्या झुंजीमुळे परिस्थिती हाताबाहेर गेली. इतकेच नाही तर नागपूरचे पोलीस उपायुक्त रवींद्र सिंगल यांच्यावरही हल्ला झाला, ज्यामध्ये अनेक पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाले. आतापर्यंत 35 हून अधिक पोलीस कर्मचारी रुग्णालयात उपचार घेत आहेत. नागपूर शहरात अशांतता निर्माण झाल्याने पोलिसांना चोख बंदोबस्त तैनात करावा लागला आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!