महाराष्ट्र

देवाभाऊ मुख्यमंत्री झाल्यानंतर Maharashtra मेट्रो पुन्हा गतीमान होणार 

मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी Nagpur मेट्रो भवन येथे दिली भेट

Post View : 23

Author

देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर मेट्रोच्या कामाने पुन्हा गती पकडली आहे. यासाठी सुजाता सैनिक यांनी नागपुरात मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला.

देवेंद्र फडणवीस खुर्चीवर येताच प्रशासनातील अधिकारी विदर्भाकडे धाऊ लागले आहेत. अशातच राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी स्वत: मेट्रोच्या कामाचा आढावा घेण्यासाठी उपराजधानी नागपुरातील मेट्रो भवन येथे भेट दिली. त्यामुळं मेट्रोच्या मार्गातील सगळे ‘रेड सिग्नल’ पुन्हा दूर होतील, असे चित्र आहे.

देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासावर भर दिला. देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांनी विदर्भातील विकासाला नवी गती दिली. नागपूर जिल्ह्यात नागरिकांच्या सोयीसाठी वेगाने मेट्रोचे काम सुरू केले. नागपुरात वेगाने मेट्रोचा विकास करून शहराला उच्च दर्जा मिळवून दिला. नागरिकांसाठी हे अतिशय अभिमानास्पद आहे. त्यानंतर सत्तांतर झाले आणि मेट्रोच्या विकासाची गती मंदावली.

Union Budget 2025: ‘लाडकी बहीण’ देशभर लागू होणार?

विकासाला मिळणार Green Signal 

आता पुन्हा देवाभाऊ राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे नागपूर मेट्रोचा वेग आता दुपटीनं वाढणार, असे चित्र दिसत आहे. नागपुरातील मेट्रो विकासाला आता ‘ग्रीन सिग्नल’ मिळून पुन्हा जोमाने काम सुरू होणार. नागपुरातीलच नव्हे तर संपूर्ण राज्याच्या विकासाचे चाक आता वेगवान होणार आहे.

राज्याच्या विकासात येणारे सर्व अडथळे आता दूर होऊन नागरिकांना सर्व सुविधांचा लाभ घेता येईल. ज्या प्रकारे फडणवीस म्हणाले होते, मी पुन्हा येईन. त्याच प्रकारे देवेंद्र फडणवीस सरकार आता राज्याला नवी रचना देणार. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर केवळ मेट्रोच नव्हे तर राज्याचा सर्वांगीण विकास गतिमान होणार, अशी अशा सर्वांमध्ये जागृत झाली आहे.

महा मेट्रोचा घेतला आढावा

महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी 31 जानेवारी रोजी नागपुरातील मेट्रो भवनला भेट देत महा मेट्रो द्वारे कार्यरत नागपूर, पुणे, ठाणे मेट्रो रेल प्रकल्पाचा आढावा घेतला. महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी महा मेट्रोच्या वतीने त्यांना मेट्रोच्या संपूर्ण कार्याची आणि प्रगतीची माहिती प्रदान केली.

सौनिक यांना मेट्रोभवनातील एक्सपरियन्स सेंटर, सिटी सेंटर मॉडेल, ऑपरेशनल कंट्रोल सेंटर देखील दाखवण्यात आले. मेट्रो ट्रेनचे कामकाज आणि ऑपरेशनल कंट्रोल सेंटरच्या इतर गोष्टींबाबत देखील त्यांना माहिती प्रदान करण्यात आली. मेट्रो ऑपरेशन्सच्या डॉट नेट, 6-डी बीम मॉडेल, गेल्या काही वर्षांमध्ये साध्य केलेली प्रगती, अंमलबजावणी दरम्यानची आव्हाने इत्यादींचे सादरीकरण करण्यात आले. आढावा बैठकीदरम्यान सौनिक यांनी महा मेट्रोशी संबंधित मंत्रालय स्तरावरील प्रलंबित समस्या जाणून घेतल्या. या समस्या तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन सुद्धा त्यांनी दिले.

जिल्ह्यासाठी अभिमानास्पद

नागपूर शहरामध्ये नागपूर मेट्रोच्या रूपात अतिशय चांगली वाहतूक प्रणाली निर्माण करण्यात आली आहे. आंतराराष्ट्रीय दर्ज्याची पायाभूत सुविधा आज नागपूर शहरामध्ये उपलब्ध आहे हे, ही अभिमानाची बाब आहे. मेट्रोचे तिकीट दर सर्व सामान्य व्यक्तींना परवडणारे आहे, असे मत सुजाता सौनिक यांनी व्यक्त केले आहे.

यासोबतच फर्स्ट अँड लास्ट माईल कनेटिव्हिटी अंतर्गत नागपूर महानगरपालिका सोबत योग्यपद्धतीने नियोजन केले. मल्टीमॉडेल इंटिग्रेशन करण्याच्या सूचना दिल्या जेणेकरून नागरिकांना सहज रित्या परिवहनाचे साधन उपलब्ध होऊ शकणार. नागरिक स्वतःच्या वाहना ऐवजी सार्वजनिक परिवहनाचे साधन जास्तीत जास्त वापरतील. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून पैसे वाचविण्यास नागरीकांना मदत होईल. सोबतच या निमित्ताने पर्यावरणाचे रक्षण करण्यास सुद्धा मदत होईल. तसेच मुख्य सचिव यांनी मेट्रो स्टेशन येथे उपलब्ध व्यवसायिक जागेवर स्थानिक कला तसेच खाद्य पदार्थ यांना कश्या प्रकारे पुढे आणता येईल व प्रेरित करता येईल यासाठी उपाय योजना कराव्या, असे निर्देश सैनिक यांनी दिले आहेत.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!