महाराष्ट्र

Ashish Jaiswal : निसर्गाच्या कुशीत डिजिटल टच

Pench Tiger Reserve : आधुनिक सुविधा आणि नवे प्रवेशद्वार

Author

पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या भविष्यातील पर्यटन धोरणांना दिशा देणारी महत्वपूर्ण पार पडली. मंत्री आशिष जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या या बैठकीत नव्या योजना, सुविधा आणि सुधारणा यांचा सखोल आढावा घेण्यात आला.

पेंच व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन व्यवस्थापन अधिक सुचारू, पर्यटकस्नेही आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत करण्याच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. 8 एप्रिल रोजी मंत्री आशिष जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक सल्लागार समितीची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे (VC) बैठक पार पडली. या बैठकीत प्रकल्पातील विविध प्रवेशद्वारांवरील शुल्क, खोल्यांचे दर, नवीन प्रवेशद्वारांची उभारणी, ऑनलाइन बुकिंगसुविधा, साहसी खेळांचे दर अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर विचारमंथन करण्यात आले.

पर्यटकांना दर्जेदार सेवा आणि अनुभव देण्यासाठी, तसेच पर्यटन क्षेत्रातून स्थानिक विकासाला चालना मिळावी, या दृष्टीने अनेक प्रस्ताव या बैठकीत मांडण्यात आले. बैठकीत सर्वप्रथम पर्यटकांसाठी उपलब्ध असलेल्या विश्रांतीगृहांच्या खोल्यांचे दर निश्चित करण्याचा मुद्दा समोर आला. विविध दर्जाचे पर्यटक लक्षात घेता, दर ठरवताना सर्वसमावेशकतेचा दृष्टिकोन बाळगण्यात येईल, असे संकेत यावेळी देण्यात आले.

Chandrashekhar Bawankule : शेतीचे वाद आता मिटणार नाममात्र खर्चात

सफारी सुविधा

कुवरा-भिवसेन बफर क्षेत्रातील पर्यटनस्थळासाठी स्वतंत्र प्रवेशद्वार उभारण्याची शिफारस समितीकडून करण्यात आली. या नवीन प्रवेशद्वारामुळे पर्यटकांची गर्दी विभाजित होईल आणि बफर भागातील पर्यटनाला अधिक चालना मिळेल. या भागातील निसर्गसौंदर्य, जैवविविधता आणि आदिवासी संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. पारदर्शक व सोयीस्कर सेवा देण्याचे दृष्टीने निर्णय घेण्यात आले आहेत. प्रकल्पात पूर्ण दिवस सफारीचा अनुभव घेण्यासाठी इच्छुक पर्यटकांसाठी, अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन पोर्टल सुरू करण्याबाबत सूचना देण्यात आली. यामुळे पर्यटनात पारदर्शकता, सोयीस्कर नियोजन आणि अधिक चांगला अनुभव मिळेल. पर्यटक आता घरबसल्या आपली सफारी अगोदरच आरक्षित करू शकतील.

बैठकीत सिल्लारी आणि खुरसापार वगळता अन्य सर्व प्रवेशद्वारांसाठी प्रवेश शुल्क 500 रुपयांपर्यंत मर्यादित ठेवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. या निर्णयामुळे अधिकाधिक पर्यटक आकर्षित होतील आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल. दरांचा पुनर्विचार करताना स्थानिकांच्या रोजगाराची संधी आणि पर्यावरण संवर्धनाचाही विचार केला जाणार आहे. कोलीतमारा संकुलात प्रस्तावित साहसी खेळांचे दर लवकरात लवकर निश्चित करावेत, अशा सूचना बैठकीत करण्यात आल्या. साहसी खेळांमुळे तरुण पर्यटकांमध्ये विशेष आकर्षण निर्माण होईल आणि पर्यटनात नवचैतन्य येईल.

Gondia : महिलांचे आत्मरक्षण गेले खड्ड्यात, आधी निधीचे पैसे टाका खिशात

धोरणात्मक निर्णय

आशिष जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली या महत्वपूर्ण बैठकीत स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य तसेच वनविभाग, पर्यटन विभाग, जिल्हा प्रशासन आणि अन्य संबंधित अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. पर्यावरण संरक्षण, स्थानिक विकास, पर्यटकांचा अनुभव आणि महसूल वृद्धी या सर्व बाबी लक्षात घेऊन धोरणात्मक निर्णय घेण्यात आले.

बैठकीत झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी केल्यास पेंच व्याघ्र प्रकल्पाचे पर्यटन अधिक शिस्तबद्ध, पर्यावरणपूरक आणि पर्यटकांसाठी अत्यंत आकर्षक बनणार आहे. स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याबरोबरच जैवविविधतेचे संवर्धन आणि पर्यटकांना अभूतपूर्व अनुभव मिळणार आहे. पेंच व्याघ्र प्रकल्प आता केवळ एक जंगल सफारी ठिकाण न राहता, एक समृद्ध पर्यटनगंतव्य बनण्याच्या दिशेने वाटचाल करतो आहे.

 

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!