महाराष्ट्र

Pyare Khan : मोदी देश जोडताहेत नितेश राणे देश फोडताहेत

Nitesh Rane : भाजप आमदाराच्या वक्तव्याने पेटली नवी ठिणगी

Share:

Author

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असताना, भाजप आमदार नितेश राणे यांनी वादग्रस्त विधान केलं. त्यांच्या वक्तव्यावर अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी देश फोडण्याचा आरोप केला आहे.

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. देशभरात या घटनेविरोधात संतापाचा उद्रेक झाला आहे. अशा परिस्थितीत, भाजप मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याने नवीन वादाला तोंड फोडले आहे. नितेश राणे म्हणाले, दहशतवादी मारण्याआधी तुमचा धर्म विचारतात, मग आपणही कोणतीही वस्तू विकत घेण्याआधी विक्रेत्याचा धर्म विचारला पाहिजे. नितेश राणे यांच्या या विधानावर अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

प्यारे खान यांनी ठामपणे सांगितले की, भारतातील मुस्लिम समुदाय आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या पाठीशी उभा आहे. पाकिस्तानच्या विरोधात संताप व्यक्त करतो आहे. देशातील प्रत्येक मशिदीतून, पाकिस्तानच्या विरोधात संतापाचे सूर ऐकू येत आहेत. पहिल्यांदाच भारतातील मुस्लिम समुदाय इतक्या मोठ्या प्रमाणात राष्ट्रहितासाठी एकवटला आहे. अशा वेळी नितेश राणे यांसारखे नेते द्वेष पसरवत आहेत, जे देशाला तोडण्याचे काम करतात, असे प्यारे खान म्हणाले.संपूर्ण भारत शोकसागरात बुडालेला असताना, द्वेषपूर्ण वक्तव्ये करणे निंदनीय आहे.

Bhandara : पंचायत समितीच्या निष्काळजीपणाचा भीषण वणवा

मुस्लिम समाजाची एकता

महाराष्ट्रातील 288 आमदारांमध्ये नितेश राणे हे एकमेव आमदार आहेत जे देश फोडण्याची भाषा करतात. इतर 287 आमदार असं कधीच काही बोलत नाहीत.  प्यारे खान पुढे म्हणाले, देशाचे पंतप्रधान देश जोडण्याचे काम करत आहेत, आणि काही नेते देश फोडण्याचे. त्यांनी नितेश राणे यांच्या विधानांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन करताना असेही सांगितले की, या प्रकारच्या वक्तव्यांमुळे देशात फूट पडू शकते. त्यांनी उदाहरण देत सांगितले की, पहलगाम हल्ल्याच्या वेळी एका काश्मिरी मुस्लिम युवक आदिलने आपले प्राण पणाला लावून पर्यटकांचे प्राण वाचवले.

युवकाच्या मदतीतून हे दाखवते की काश्मिरी मुस्लिम सुद्धा देशासोबत आहेत. माओवाद  विरोधात लढत आहेत, असे प्यारे खान म्हणाले. नितेश राणे यांचे विधान समोर आल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले आहे. काही हिंदू संघटनांनी त्यांच्या वक्तव्याला पाठिंबा दर्शवला असला, तरी अल्पसंख्यांक समाजातून संताप आणि टीकेची लाट उठली आहे. नितेश राणे यांनी अप्रत्यक्षपणे मुस्लिमांचा अपमान केल्याचे म्हटले जात आहे. नितेश राणे यांनी पुढे सुचवले की, जर कोणी दुकानदार हिंदू असल्याचे सांगितले, तर त्याला हनुमान चालीसा म्हणायला लावा. जर त्याला येत नसेल, तर त्याच्याकडून काहीही खरेदी करू नका.

Sanjay Gaikwad : महाराष्ट्रात गुन्हेगार हसतात अन् पोलिस गप्प बसतात 

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!