
बीडाच्या प्रकरणावरून सध्या राजकारण तापलं आहे. अनेक नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. अशात आमदार अमोल मिटकरी आणि संदीप क्षीरसागर यांच्यात टोकाची टीका सुरू झाली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी संतापले आहेत. त्यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर टोकाची टीका केली आहे. त्यामुळं बीडच्या प्रकरणात आता आमदार सुरेश धस, अमोल मिटकरी, संदीप क्षीरसागर असा तिहेरी सामना रंगला आहे. बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन राजकारण चांगलच तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करीत आहेत. बीडच्या प्रकरणावरून राज्यात मोर्चाही काढण्यात आला. आता यावरून राजकीय नेत्यांमध्ये ‘वॉर’ सुरू झालं आहे.
आमदारांच्या खालच्या भाषेचा स्तर आता बघायला मिळत आहे. आमदार सुरेश धस यांच्याकडून राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते अजित पवार यांना लक्ष्य करण्यात आलं. धनंजय मुंडेंना मोठे आका म्हणत त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. धस यांच्या टीकेनंतर आमदार अमोली मिटकरी यांनी त्यांना टार्गेट केलं. मिटकरी यांनी धस यांच्याबाबत अनेक आरोप केले. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या इरेन दिवसांपूर्वी धस यांनी वाल्मिक कराडशी फोनवरुन संपर्क केल्याचा दावा मिटकरी यांनी केला. हे आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच नवा वाद सुरू झाला आहे.

दोघांत Twitter War
आमदार अमोल मिटकरी आणि संदीप क्षीरसागर यांच्यात आता ट्विटर वॉर सुरू झालं आहे. आमदार संदीप क्षीरसागर (Sandip kshirsagar) यांनी अजित पवारांवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देतान आमदार मिटकरी यांनी संदीप क्षीरसागर यांना चक्क कलंक्या म्हटलं आहे. बीडमधील हत्याप्रकरणात मोर्चा काढण्यात आला. या मोर्चातील नेत्यांनी अजित पवार यांना टार्गेट केलं. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करुन त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली. अजित पवार हे मराठा नावाल कलंक असल्याची टीकाही एका नेत्यानं केली. तेव्हापासून टीका टीप्पणी होत आहे.
बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यालयीन ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भाने एक ट्विट करण्यात आलं. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करण्यात आली. त्यानंतर आमदार अमोल मिटकरी भडकले. क्षीरसागर यांच्या ट्विटनंतर दोन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सोशल मीडिया वॉर सुरू झालं. जो स्वतःच्या काकाचा मान ठेवत नाही, तो जनतेचा काय मान ठेवील? मराठा नावाला कलंक.! स्वयंघोषित दादा.! अशा आशयाचे ट्विट आमदार क्षीरसागर यांच्या कार्यालयीन अकाऊंटवरुन करण्यात आले होते. त्याला आमदार मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं.
कशाला अक्कल पाजळतोस? तुझ्या वडिलांबद्दल तुझी वागणूक अख्ख्या देशाने बघीतली आहे. तू तर मानव जातीला कलंक आहेस. आपली लायकी पाहून वागत जा. मराठा व इतर सर्व बहुजन समाजात आई-वडील श्रेष्ठ मानल्या जातात. तू नेता व्हायच्या लायकीचा आहेस का, आरशात बघ जरा #कलंक्या, अशा शब्दात आमदार मिटकरी यांनी क्षीरसागर यांच्यावर टीका केली. त्यामुळं आता आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर, अमोल मिटकरी असा तिहेरी वाद सुरू झाला आहे.