महाराष्ट्र

चंद्रपुरातील अवैध Oyo Hotels विरोधात आमदार सरसावले

बल्लापूर मार्गावर प्रेमी युगुलांमुळे त्रास वाढल्यानं Kishore Jorgewar सरसावले

Author

अलीकडच्या काळात प्रेमी युगुलांना स्वस्त दरात ओयो हॉटेल मिळत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात हा प्रकार वाढला आहे. याविरोधात आता चंद्रपुरातील आमदारांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर बायपासवर मोठ्या प्रमाणावर ओयो हॉटेल्सची संख्या वाढली आहे. या हॉटेल्समध्ये स्वस्त दरात प्रेमी युगुलांना खोल्या भाड्यानं दिल्या जात आहेत. या हॉटेल्सच्या विरोधात आता आमदारांनी कारवाईचं हत्यार उपसलं आहे. चंद्रपूर शहरातील बल्लारपूर बायपास रोड आणि इतर भागात ओयो हॉटेलचे पेव फुटले आहे. काही दिवसातच बल्लारपूर बायपास मार्गावर 14 हॉटेल सुरू झाले आहेत. सरकारी किंवा ओयो कंपनीची परवानगी न घेता हा प्रकार सुरू असल्याची तक्रार पुढं आली आहे. त्यामुळं आता राजकीय नेते या हॉटेल्सविरोधात मैदानात उतरले आहेत.

ओयो असे सर्रासपणे फलक लावलेले हॉटेल्स अश्लील कृतींना खतपाणी घालत आहेत. त्यामुळं चंद्रपूरचे भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी आता हॉटेल हटाव मोहिमेला हिरवा कंदील दाखविला आहे. हॉटेल्स सर्रासपणे अश्लील चाळ्यांना प्रोत्साहन देत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. याविरोधात ओयो हटवा मागणी होत आहे. काही दिवसांपूर्वी नागरिकांनी एका हॉटेल समोर दिवसांपूर्वी भजन आंदोलन केलं. आता या मोहिमेत आमदार जोरगेवार हे देखील उतरले आहेत. त्यामुळं अनेक भागातील ओयो हॉटेल्सवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

निवडणूक पराभवाच्या Congress नेते अजूनही धक्क्यात

नागरिक Action Mode मध्ये

आमदार किशोर जोरगेवार यांनी चौकशी करून अनधिकृत हॉटेल्स हटवा अशी मागणी प्रशासनाला केली आहे. यामुळे समाज स्वास्थ बिघडेल व मुली फसविल्या जातील असेही जोरगेवारांनी स्पष्ट केले आहे. प्रेमी युगुलांना स्वस्त दरात सुविधा उपलब्ध करून देण्याचा देखावा केला जात आहे. हॉटेल्समध्ये देहविक्री व्यापारही होत असल्याची टीका होत आहे. हॉटेल सुरू करण्यासाठी मालकांनी सरकार, ओयो किंवा महापालिकेची परवानगी घेतली नसल्याचं पुढं आलं आहे. नागरिकांच्या या संतप्त भावना लक्षात घेऊन चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार हे आक्रमक झाले आहेत. ही हॉटेल्स तातडीने बंद करण्याचा इशारा आमदार जोरगेवार यांनी दिला आहे.

ओयो कंपनीनं आता खोली मिळण्याबाबत आपल्या नियमातही बदल केले आहेत. हॉटेल्समध्ये अविवाहित जोडप्यांना यापुढं प्रवेश मिळणार नाही. उत्तर प्रदेशातील मेरठपासून हा नियम लागू करण्यास ओयो कंपनीनं सुरूवात केली आहे. ओयोकडून आपल्या सर्व हॉटेल पार्टनरला याबाबत कळविण्यात आलं आहे. त्यानुसार अविवाहित जोडप्यांना यापुढं प्रवेश देण्यात येऊ नये असं सांगण्यात आलं आहे. संपूर्ण देशात हा नियम लागू होणार आहे. 2025 मध्ये ओयो चेक-इन पॉलिसी बदलण्यात आल्याचं कंपनीकडून जाहीर करणयत आले आहे. अलीकडच्या काळात ओयो कंपनीची प्रतिमा यामुळं डागाळली होती. चांगल्या कुटुंबातील लोकं ओयोवरून हॉटेल बुक करीत नव्हते.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!