महाराष्ट्र

Harish Pimple : देवा भाऊंच्या जंगी स्वागतासाठी आमदार झाले सज्ज

Devendra Fadnavis In Akola : जिल्ह्यात रणनीती आणि संधीचा संगम

Post View : 77

Author

अकोल्याच्या राजकारणात सध्या एकच गजर आहे, देवा भाऊ येत आहेत. आमदार हरीश पिंपळे यांच्या नेतृत्वात मूर्तिजापूर भाजपने स्वागतासाठी उभारले विकासाच्या आशेचे व्यासपीठ.

घरावर तुळशीपत्र ठेवून, निष्ठेची सावित्रीसारखी साधना करणारे मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे आता आपल्या ‘देवा भाऊ’चं स्वागत करण्यासाठी पूर्ण ताकदीने सज्ज झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अकोला दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, मूर्तिजापूरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जणू काही विकासाच्या नव्या अध्यायाचे भूमिपूजन होणारच आहे आणि या यजमानपदाची सूत्रे हरीश पिंपळेंच्या हातात आहेत.

भारतीय जनता पक्षाचे जमीनीवर कार्य करणारे लोकप्रिय आमदार म्हणून परिचित असलेले हरीश पिंपळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी भव्य योजना आखल्याचे संकेत आहेत. त्यांच्या नेतृत्वात संपूर्ण मूर्तिजापूर भाजपाने एकच निर्धार केला आहे, तो म्हणजे  स्वागतासाठी झगमगाट नाही, तर कार्यकर्त्यांची निष्ठा आणि आत्मा असणार.

Mahayuti : घ्या रे बा… सत्ताधारी आमदारानेच मान्य केले विरोधकांचे आरोप

महत्त्वाचा दौरा

देवेंद्र फडणवीस हे सुमारे तीन हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन करणार आहेत. त्यामुळे केवळ मूर्तिजापूरच नव्हे तर संपूर्ण अकोला जिल्ह्याला नवसंजीवनी मिळणार आहे. हा दौरा आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील महत्त्वाचा मानला जात असून, भाजपसाठी रणनीती आखण्याचा केंद्रबिंदू ठरणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी आणि कार्यक्रमाच्या नियोजनासाठी शासकीय विश्रामगृह, मूर्तिजापूर येथे विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये हरीश पिंपळे यांनी कार्यकर्त्यांना दिशा दिली. हे फक्त मुख्यमंत्र्यांचं आगमन नाही, हा आपल्या पक्षाचं बळ वाढवण्याचा ऐतिहासिक क्षण आहे. या बैठकीत यशस्वी कार्यक्रमासाठी कार्यविभाग, जबाबदाऱ्या, नियोजन यावर सविस्तर चर्चा झाली.

Congress : सोनिया गांधींची प्रकृती खालावली

विकासाचे नवे दालन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिनांक 11 जून 2025 रोजी अकोल्यामध्ये येणार आहेत. हरीश पिंपळे यांच्या मतदारसंघात एक मोठा राजकीय उत्सव उभा राहणार आहे. विकासाचे नवे दालन खुलं होण्याची शक्यता आहे. मागील वेळेस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दौऱ्याने मूर्तिजापूरला महामार्गाचं गिफ्ट मिळालं होतं. आता हरीश पिंपळे यांच्या पक्षनिष्ठेचे फळ ‘देवा भाऊ’ कोणत्या स्वरूपात देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे केवळ गिफ्ट नसून, मूर्तिजापूरच्या भविष्यातील विकासाचे संकेतही ठरणार, असे संकेत आहे.

हरीश पिंपळे यांचं राजकीय व्यक्तिमत्व हे कार्यकर्त्यांच्या सोबतीनं घडलेलं आहे. त्यांनी पक्षासाठी रात्रंदिवस परिश्रम घेतले. कोणतीही अपेक्षा न ठेवता, केवळ जनतेच्या आणि पक्षाच्या सेवेसाठी त्यांनी स्वतःला झोकून दिलं. आज त्यांच्या या निष्ठेचं चीज होत आहे. देवेंद्र फडणवीस यांचा अकोला दौरा हा केवळ औपचारिक कार्यक्रम नाही, तर भाजपची आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठीची रणनिती, जनतेशी नव्याने जोडण्याची संधी आणि पिंपळेंच्या नेतृत्वातील मूर्तिजापूरची नवदिशा ठरणार आहे.

प्रसन्न जकाते | Prasannaa Jakate

प्रसन्न जकाते | Prasannaa Jakate

मातृभूमी (अकाेला), सकाळ (अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम, अमरावती), दैनिक भास्कर हिंदी (मराठवाडा वृत्त विभाग प्रमुख) , महाराट्र टाइम्स (नागपूर), भास्कर समूहाचे मराठी दैनिक दिव्य मराठी (अमरावती), सकाळ माध्यम समूहाचे पॉलिटिकल वेब पोर्टल सरकारनामा असा प्रसन्न यांचा पत्रकारितेचा सुमारे 26 वर्षांचा प्रवास आहे. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या हस्ते प्रसन्न यांचा शोध प्रबंध भुवनेश्वर येथील भारतीय विज्ञान मेळाव्यात प्रकाशित करण्यात आला. क्राइम रिपोर्टिंग पासून आपल्या पत्रकारितेचा प्रवास सुरू करणाऱ्या प्रसन्न यांनी गडचिरोली, छत्तीसगडमधील बक्स, अबुजमाड या नक्षलवाद्यांची भीषण दहशत असलेल्या भागात ग्राऊंड रिपोर्टिंग केले आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश येथील अनेक निवडणुकीचे रिपोर्टिंगही त्यांनी केले आहे. महाराष्ट्रातून स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट (सिमी) आणि दिनदार-ए-अंजुमन या दोन प्रतिबंधित संघटनांचे नेटवर्क उद्ध््वस्त करणारे रिपोर्टिंगही त्यांनी केले. मुंबई हल्ल्यातील दहशतवादी याकुब मेमन याच्या फाशीच्या घटनेचे ‘ऑन द स्पॉट’ आणि कुठेही न प्रकाशित झालेले वार्तांकनही त्यांनी नागपूर येथे केले.

More Posts

Follow Me:Add me on XAdd me on Facebook

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!