महाराष्ट्र

बोगस औषध, डॉक्टरांना Doctor फुके यांचं इंजेक्शन

Vidhan Parishad मध्ये उचलला आवाज

Share:

Author

चमकोगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनंतर आता आमदार डॉ. परिणय फुके यांनी बोगस डॉक्टर, औषध पुरवठादारांविरोधात आवाज बुलंद केला आहे.

कोणताही आजार बळावला की डॉक्टर औषधोपचार करतात. प्रसंगी चांगलं इंजेक्शन देतात. आजार बराच गंभीर असेल तर अनेकदा ऑपरेशनही करावं लागतं. भंडारा-गोंदियातील हेवीवेट भाजप आमदार डॉ. परिणय फुके यांनी रीलच्या माध्यमातून चमकोगिरी करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना शिस्तीची गोळी द्या, अशी मागणी सरकारकडं केली आहे. त्यानंतर डॉक्टर साहेबांनी पुढचा नंबर बोगस औषध पुरवठादार अन् डॉक्टरांचा लावला आहे. अशा डॉक्टरांना चांगलं इंजेक्शन टोचण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.

महाराष्ट्रात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट आहे. बोगस औषधही मिळत आहेत. हे सगळे मुन्नाभाई एमबीबीएस असल्याचं भासवत अनेकांवर उपचार करीत आहेत. बोगस औषधांचा पुरवठाही केला जात आहे. त्यातून गोरगरीब जनतेच्या आरोग्याशी खेळ होत आहे. या सगळ्याला जालीम औषध देण्याची गरज असल्याचं आता डॉ. परिणय फुके यांनी सरकारच्या लक्षात आणून दिलं आहे. यासंदर्भात फुके यांनी राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आवाज उठवला आहे. विधान परिषदेत त्यांनी हा मुद्दा मांडत बोगसबाज औषध पुरवठादार, डॉक्टरांच्या ‘प्रॅक्टिस’ला कायमचा ‘अॅनेस्थिशिया’ देण्याची मागणी केली आहे.

Parinay Fuke शब्द टाकणार अन् देवाभाऊ नाही ऐकणार, ‘हो ही नही सकता’

पेशंटचे जीवन In Danger

बोगस डॉक्टरांमुळं, औषध पुरवठादारांमुळं अनेक ठिकाणी रुग्णांचे आरोग्य धोक्यात आलं आहे. अलीकडेच राज्यातील काही हॉस्पिटलमध्ये बनावट औषध आढळली. पुरवठा करणाऱ्या कंपनीकडं औषधांचा परवानाच नसल्याचं उघडकीस आलं. त्यामुळं बोगस डॉक्टरांप्रमाणे बोगस औषधांचा मुद्दाही गंभीर झाल्याचं आमदार डॉ. परिणय फुके यांनी विधान परिषदेत नमूद केलं. बोगस औषध अन् बोगस डॉक्टर्समुळं मोठ्या प्रमाणावर जीव धोक्यात येऊ शकतात. त्यामुळं आता गंभीर कारवाईची वेळ आल्याचं भाजपच्या या डॉक्टर आमदारानं नमूद केलं.


महाराष्ट्रात बोगस डॉक्टर अन् बोगस औषधांचा मुद्दा उजेडात आला आहे. त्यामुळं प्रशासकीय यंत्रणा गंभीर नसल्याचं दिसत आहे. बोगस औषधांचा साठा रुग्णालयांमध्ये येतोच कसा‌? असा प्रश्नही डॉ. फुके यांनी व्यक्त केला. विधान परिषदमध्ये बोलताना त्यांनी महाराष्ट्रात औषधांच्या तपासणीसाठी खास यंत्रणा तयार करण्याची गरज असल्याचं नमूद केलं. सद्य:स्थितीत औषधांची तपासणी कशी केली जाते याची माहिती डॉ. फुके यांनी दिली. औषधांच्या तपासणीसाठी आणखी व्यापक तंत्र वापरावं असं डॉ. फुके यांनी सुचविलं.

यंत्रणा Offline Mode मध्ये

राज्यातील वैद्यकीय यंत्रणा सध्या सुस्तावली आहे. बोगस डॉक्टर, बोगस औषध पुरवठादार यांचा शोध घेण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नाही. पुरेशी यंत्रणा नाही. त्यामुळं सगळ्यांचं फोफावत आहे. जोपर्यंत एकूणच या सगळ्या व्यवस्थंचे ऑपरेशन केलं जात नाही, तोपर्यंत बोगसबाजीचा हा कॅन्सर पसरत जाईल. त्यातून कोणाचे किती जीव जातील, याचा नेम नसल्याकडंही आमदार डॉ. परिणय फुके यांनी लक्ष वेधलं.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!