प्रशासन

Pravin Datke : नोकरीच्या आमिषाने नागरिकांची फसवणूक

Nagpur : प्रविण दटके यांच्या नावाने शहरात गंडा

Author

नागपूरमध्ये आमदार प्रविण दटके यांच्या नावाचा गैरवापर करून एका अज्ञात व्यक्तीने फसवणुकीचा प्रयत्न केला आहे. नोकरी व शासकीय योजनांच्या नावाने नागरिकांकडून पैसे उकळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

शहरात पुन्हा एकदा फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूरचे आमदार आणि मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे प्रवीण दटके यांच्या नावाने एका अज्ञात व्यक्तीने नागरिकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे. नोकरी लावून देतो, तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देतो, असे सांगत पैशांची मागणी करण्यात आली.

घडलेल्या प्रकारामुळे नागपूरच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. दटके यांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. नागरिकांनी अशा भामट्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. फसवणुकीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावरही जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.

Raj Thackeray : सत्तेच्या रणांगणात दोन वंशांचे वादळ 

जनजागृतीचे आवाहन

शहरात केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना राबवल्या जातात. याच योजनांची नावं पुढे करून अज्ञात व्यक्तीने काही नागरिकांना कॉल करून आमदार दटके यांच्या ओळखीने योजना मंजूर करून देण्याचे आमिष दाखवले. काही लोकांनी या संदर्भात थेट आमदार दटके यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा या फसवणुकीचा प्रकार उघड झाला. दटके यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणाचा आमच्या किंवा आमच्या सहकाऱ्यांशी काहीही संबंध नाही. ही संपूर्ण फसवणूक आहे. नागरिकांनी अशा कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. त्यांच्या नावाचा गैरवापर करून कोणी फसवणूक करत असेल तर त्याची माहिती पोलिसांना त्वरित द्यावी.

घडलेल्या प्रकरणानंतर आमदार दटके यांनी सोशल मीडियावरून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या नावाने कोणी नोकरी, योजना मंजुरी किंवा इतर लाभ देण्याचे आश्वासन देत असेल, तर अशा व्यक्तींपासून दूर राहावे. कोणतीही रक्कम न देता पोलिस किंवा त्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, अशी स्पष्ट सूचना त्यांनी दिली आहे. अशा फसवणुकीचे बळी ठरू नये म्हणून त्यांनी पोलिस प्रशासनालाही सखोल तपास करण्याची विनंती केली आहे. नागपूरसारख्या शहरात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी नागरिकांनी सजग राहावे. कुठल्याही शंका असलेल्या गोष्टी तातडीने पोलिसांपर्यंत पोहोचवाव्यात.

Nagpur : वीजपुरवठा समस्यांवर मात करण्यासाठी नवीन ‘व्हाट्सअप’ यंत्रणा

सहकार्य आवश्यक

प्रवीण दटके हे नागपूरमध्ये कार्यक्षम आणि लोकाभिमुख आमदार म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी विश्वास आहे. मात्र अशा विश्वासाचा गैरफायदा घेणाऱ्यांकडून नागरिकांची फसवणूक होणे अत्यंत दुर्दैवी आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा हे स्पष्ट झाले आहे की, कुठल्याही लाभासाठी शॉर्टकट्स किंवा ओळखीच्या आधारावर पैसा देणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळेच अशा प्रलोभनांना बळी न पडता, अधिकृत मार्गानेच कामे करण्याचा आग्रह प्रत्येक नागरिकाने धरावा.

फसवणुकीचा तपास आता पोलिसांकडे आहे. संबंधित अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू आहे. या प्रकरणात नागपूर पोलिसांनी नागरिकांचे सहकार्य मागितले आहे. कुणालाही अशा प्रकारचे कॉल, मेसेज किंवा इमेल आले असतील, तर त्याची माहिती त्वरीत पोलिसांना द्यावी. दटके यांच्या नावाचा गैरवापर करून शहरात अशा प्रकारे फसवणूक करण्याचा प्रकार गंभीर आहे. त्यावर कठोर कारवाई होणार असल्याचे संकेत पोलिस सूत्रांनी दिले आहेत. नागरिकांची आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी प्रशासन आणि आमदार दोघेही सजग असल्याचे स्पष्ट झाले आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!