महाराष्ट्र

ऑपरेशन टायगरचा Mahavikas Aghadi नेत्यांना दणका

आणखी नेत्यांचा होणार Shiv Sena शिंदे गटात प्रवेश ?

Author

राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे वेध लागले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. सर्वच नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिला आहे. दुसरीकडे शिवसेना एकनाथ शिंदे गट ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून ठाकरे गटासह महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के देत आहेत. पुण्यातील महाविकास आघाडीच्या तीन माजी आमदारांसह 9 बडे नेते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे “ऑपरेशन टायगर” चा दणका पुण्यात सुद्धा पाहायला मिळणार आहे. पुण्यातील 3 माजी आमदार या महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात शिंदे गटात प्रवेश करतील, अशी माहिती मिळत होत आहे. त्यांच्याबरोबर आणखी 6 नेते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार, असल्याची माहिती आहे. काँग्रेसचे दोन नेते आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे चार नेते शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात आहेत, अशी माहिती सूत्रानुसार प्राप्त झाली आहे.

Finance Minister खडूसच असायला पाहिजे

आघाडीला लागणार गळती 

राज्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसमधील अनेक आमदारांनी पक्षाला रामराम ठोकत दुसऱ्या पक्षात प्रवेश केला. आता आणखी काही आमदार आणि खासदार हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, अशी चर्चा सर्वत्र रंगात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठी गळती लागण्याची शक्यता आहे.

शिवसेनेत लवकरच प्रवेश करणाऱ्या अनेक नेत्यांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा आणि बैठका सुरू झाल्या असल्याची माहिती मिळत आहेत. महाविकास आघाडीला धक्का देण्यासाठी ऑपरेशन टायगर सक्रीय झाले असून यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तसेच कॉंग्रेसचे बरेच नेते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

शिवसेना नेते मंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी ऑपरेशन टायगरसंदर्भात भाष्य केले होते. त्यावेळी काही माजी आमदार व खासदार आमच्या संपर्कात आहेत आणि लवकरच त्यांचा शिवसेनेत प्रवेश होईल, असा दावा सामंत यांनी केला होता. त्यानुसार शिवसेना ठाकरे गटासह पुण्यातील काही आमदार हे शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेणार असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेकांच्या चर्चा झाल्याचीही माहिती आहे. कॉंग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनीही एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. दरम्यान वैयक्तिक कामासाठी ही भेट असल्याचे धंगेकर म्हणाले होते.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!