महाराष्ट्र

गोंदियाच्या मेकओव्हरसाठी Prashant Padole यांची दिल्ली झेप

पूर्व विदर्भातील Rail Network माध्यमातून विकासासाठी आग्रही

Share:

Author

प्रगतशील दृष्टिकोन आणि विकासाच्या संकल्पनेवर भर देणारे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी आता भंडारा–गोंदियाच्या चौफेर विकासाच्या ध्यास घेतलेला दिसत आहे. पूर्व विदर्भातील या जिल्ह्यासाठी त्यांनी दिल्लीची ट्रेन पकडली आहे.

एकेकाळी माओवादाने ग्रासलेल्या गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये नागरिकांना मोकळेपणाने फिरणेही शक्य नव्हते. मात्र सरकार, प्रशासन आणि पोलिसांच्या समन्वयातून गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यातील माओवाद उखडून फेकला गेला. गडचिरोली जिल्ह्यात अद्याप काही भागात माओवादी सक्रिय असले, तरी त्यांची ताकद आता जवळपास संपलेली आहे. अशा परिस्थितीत पूर्व विदर्भातील हा संपूर्ण पट्टा विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दळणवळणाच्या सुविधा मजबूत करणे अत्यंत गरजेचे आहे. ही गरज ओळखत भंडारा–गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी ‘रेल्वे कनेक्टिव्हिटी’चे औषध शोधून काढले आहे.

भंडारा आणि गोंदिया हे धान उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे जिल्हे आहेत. येथे मोठ्या प्रमाणात ‘राईस मिल्स’ कार्यरत आहेत. मात्र या भागातील दळणवळणाची साधने मर्यादित आहेत. दुर्गम भागांमुळे बसेसची संख्या कमी आहे. सध्या रेल्वे गाड्यांची उपलब्धता देखील मर्यादित आहे. परिणामी स्थानिक शेतकरी आणि उद्योजक यांना वाहतूक आणि व्यापारात अडचणी येतात. गोंदिया, भंडाऱ्याचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन कार्य करण्याचा निश्चय केल्याचे आपल्या एका भेटीतून दाखवून दिले.

गडचिरोलीसाठी State Government मधील दोन्ही मंत्री ॲक्शन मोडमध्ये

विकासाला गतीचा प्रयत्न

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचे निकटवर्ती असलेले डॉ. पडोळे यांनी पूर्व विदर्भातील रेल्वे नेटवर्क सुधारण्यासाठी थेट दिल्ली गाठली. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील रेल्वेची जोडणी सक्षम भावी यासाठी त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे ठाण मांडले. अश्विनी वैष्णव यांच्याशी भेट घेऊन डॉ. पडोळे यांनी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या भौगोलिक, आर्थिक स्थितीची सविस्तर माहिती दिली.

दोन्ही जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात, अशी मागणी त्यांनी केली. राईस मिल उद्योगाला वाहतूक आणि निर्यातीसाठी रेल्वेचा अधिक लाभ होईल. दोन्ही जिल्ह्यातून प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी रेल्वे गाड्यांची संख्या वाढवण्यात यावी, असा आग्रह त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे धरला. याशिवाय अनेक मुद्द्यांवर त्यांनी ठोस चर्चा केली. भंडारा, गोंदिया जिल्ह्यात मालवाहतूक आणि प्रवासी गाड्यांची संख्या याकडे लक्ष वेधले. नव्या रेल्वे मार्गांसाठी विशेष निधी मंजूर करावा करण्याचा प्रस्ताव दिला. दुर्गम भागांसाठी रेल्वे नेटवर्क अधिक मजबूत करावे, यासाठी त्यांनी रेल्वे मंत्र्यांशी चर्चा केली.

फिनिक्स मॅरेथॉनमुळे Nagpur ठरणार फिटनेस मध्ये प्रेरणादायी

मागासलेपण दूर होईल

भंडारा, गोंदियाचा व्यापक विकास साधायचा असेल तर रेल्वेच्या पायाभूत सुविधांचा विस्तार अनिवार्य आहे. दिल्लीपासून गोंदियाच्या गल्लीपर्यंत विकासाचा प्रवाह पोहोचवण्यासाठी खासदार डॉ. पडोळे यांनी हा पुढाकार घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळे दोन्ही जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल. नागरिकांना अधिक सोयीस्कर आणि वेगवान दळणवळण सेवा उपलब्ध होईल. त्यामुळे स्थानिक शेतकरी, व्यापारी आणि प्रवाशांसाठी नव्या संधी खुल्या होतील.
खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांचा हा ठोस पुढाकार भंडारा, गोंदियाच्या परिवर्तनासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरू शकतो.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!