प्रशासन

Operation Thunder : एमडी ड्रग्जच्या गर्तेतून नागपूरची सुटका सुरू

Nagpur Police : गुन्हेगारांचे धाबे दणाणले

Author

नागपुरात गेल्या काही दिवसांपासून अमली पदार्थांच्या तस्कऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. दररोज नवनवीन घटनाक्रम उघडकीस येत असून, पोलिसांकडून योग्य ती कारवाई करत आहे.

गुन्हेगारीच्या गर्द अंधारावर आता कडक वज्रप्रहार सुरू झाला आहे. नागपूर शहराच्या पोलिस दलाने ऑपरेशन थंडर या मोहिमेच्या माध्यमातून कायदा आणि सुव्यवस्थेचा मजबूत वटवृक्ष रुजवण्याचा निर्धार केला आहे. पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या या मोहीमेमुळे नागपूरच्या गुन्हेगारी विश्वात चांगलीच खळबळ उडाली आहे. शहरासोबतच राज्यभरात अमली पदार्थांच्या वाढत्या तस्करीवर पोलिसांनी ठोस आणि प्रभावी पावले उचलली आहेत. मागील काही दिवसांत नागपूरसह विविध भागांत गांजा आणि एमडी ड्रग्जच्या तस्करीत लक्षणीय वाढ झाल्याचे पोलिसांच्या गुप्त माहिती प्रणालीतून निष्पन्न झाले.

पोलिसांनी त्यावर काटेकोर नजर ठेवून कारवाईची रणनीती आखली. या रणनीतीचा भाग म्हणून नागपूर शहरात राबवण्यात येणाऱ्या ऑपरेशन थंडर मोहिमेअंतर्गत अजनी पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे. अजनी पोलिस ठाण्याच्या विशेष पथकाने सप्रेम झडप घालून तिन्ही ड्रग्ज तस्करांना अटक करण्यात यश मिळवले आहे. त्यांच्या ताब्यातून तब्बल तीन लाख रुपयांच्या एमडी ड्रग्जसह इतर साहित्यही हस्तगत करण्यात आले आहे. या कारवाईचा सूत्रधार ठरला पोलिस कर्मचारी अतुल टिकले. न्यू कैलास नगरमधील आंबेडकर कॉलेजजवळ एक युवक एमडी ड्रग्जच्या विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती टिकले यांना मिळाली.

Bacchu Kadu : जलसमाधीच्या रूपात प्रहार कार्यकर्त्यांचा विरोध

पोलीस निरीक्षकांचे समाधान

माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरात सापळा रचून अमित ताराचंद लोखंडे या तरुणाला एका अ‍ॅक्टिव्हा स्कूटरसह रंगेहाथ पकडले.पोलिसांनी अमितच्या झडतीदरम्यान त्याच्याकडून 2.5 ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि एक मोबाइल जप्त केला. पुढील चौकशीत त्याने हे मादक पदार्थ लोकेश सुरेश भोडे याच्याकडून घेतल्याची कबुली दिली. लगेचच पोलिसांनी लोकेशच्या निवासस्थानी छापा टाकून त्याला अटक केली. त्याच्याकडून 5 ग्रॅम एमडी ड्रग्ज, एक दुचाकी आणि एक मोबाइल फोन असा अंदाजे 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. लोकेशच्या चौकशीतून पुढील धागा मिळाला.

दत्तू ऊर्फ विशाल अंबादास दाभने या तिसऱ्या तस्कराचा. पोलिसांनी त्वरित कारवाई करत विशाललाही ताब्यात घेतले. त्याच्याकडून 29.5 ग्रॅम एमडी ड्रग्ज, दोन मोबाइल आणि इतर साहित्य हस्तगत करण्यात आले.या तिन्ही आरोपींकडून मिळून एकूण 37 ग्रॅम एमडी ड्रग्ज, दुचाकी वाहने, मोबाइल फोन आणि इतर साहित्य असा सुमारे 2 लाख 87 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिनचंद्र राजकुमार यांनी या मोहिमेच्या यशस्वी कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले. राजकुमार यांनी सांगितले की, ऑपरेशन थंडर अंतर्गत संपूर्ण शहरातील मादक पदार्थांच्या तस्करीवर कठोर नजर ठेवली जात आहे.

Shalartha ID Scam : पासवर्डच्या एका क्लिकमध्ये कोट्यवधींची कमाई

आगामी काळात अशा आणखी धडक मोहिमा राबवून ड्रग्ज माफियांना मूळासकट नष्ट करण्याचा पोलिसांचा निर्धार आहे. नागपूर पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे शहरात ड्रग्ज तस्करांच्या टोळ्यांमध्ये खळबळ उडाली असून, ऑपरेशन थंडरने खर्‍या अर्थाने नागपूरच्या रस्त्यांवर कायदा आणि सुव्यवस्थेचा नवा आत्मविश्वास निर्माण केला आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!