प्रशासन

Nagpur : बोगस शिक्षक प्रकरणात आणखी तिघांना अटक

Education Scam : नियमबाह्य नियुक्तीमुळे सरकारी तिजोरीला फटका

Author

नागपूर जिल्ह्यातील बोगस शिक्षक घोटाळ्याप्रकरणी आणखी तीन शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

नागपूर जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शाळांमध्ये काही दिवसांपूर्वी एक मोठा घोटाळा समोर आला होता. तब्बल 580 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती नियमबाह्य पद्धतीने करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या अपात्र कर्मचाऱ्यांना सरकारी निधीतून अनेक वर्ष वेतन दिल्यामुळे शासनाच्या तिजोरीला कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आता कडक कारवाई सुरू केली आहे. या घोटाळ्यात आता आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे.

भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील एका शाळेत बोगस मुख्याध्यापक नेमल्याच्या प्रकरणातून या तपासाला सुरुवात झाली होती. तपास आता नागपूर जिल्ह्यातील खाजगी शाळांमधील मोठ्या प्रमाणातील अपात्र शिक्षकांपर्यंत पोहोचला आहे. या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर याआधी नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड आणि बोगस पद्धतीने नेमणूक मिळवणारे मुख्याध्यापक पराग पुंडके यांना अटक करण्यात आली होती. आता या प्रकरणाचा तपास अधिक खोलवर नेण्यात येत असून, नागपूर पोलिसांनी अजून तीन अधिकाऱ्यांना अटक केली आहे.

Umred Blast : एमएमपी कंपनीच्या तीन अधिकाऱ्यांवर पोलिसांचा खटला

शालार्थ आयडीचा गैरवापर

अटक करण्यात आलेल्यांमध्ये निलेश मेश्राम, संजय दुधाळकर आणि सुरज नाईक यांचा समावेश आहे. पोलिसांनी रात्रीच्या सत्रात ही कारवाई करत तीनही आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, 2019 पासूनच ही अपात्र भरती सुरू असल्याचे शिक्षण विभागाने त्यांच्या अधिकृत आदेशात मान्य केले आहे. नागपूर जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शाळांमध्ये शेकडो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती पूर्णपणे नियमबाह्य पद्धतीने झाली आहे. शिक्षण प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

अपात्र नियुक्त्यांना केवळ भरतीच नव्हे, तर त्यांना शासकीय वेतन मिळवण्यासाठी आवश्यक असणारी शालार्थ आयडी सुद्धा चुकीच्या मार्गाने दिली गेली. त्यामुळे या बोगस कर्मचाऱ्यांना अनेक वर्ष शासनाच्या निधीतून वेतन दिले गेले आणि त्यामुळे सरकारी तिजोरीला प्रचंड नुकसान पोहोचले आहे. या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच नागपूर जिल्हा परिषदेचे वेतन अधीक्षक निलेश वाघमारे यांना निलंबित करण्यात आले होते. त्यांच्या निलंबनाच्या आदेशातच शिक्षण विभागाने अधिकृतपणे हे मान्य केले की, 2019 पासून 580 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बेकायदेशीर मार्गाने भरती करण्यात आले.

Yavatmal : शासन दारी नव्हे, थेट हातात 

सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर नागपूरमधील शिक्षण क्षेत्र हादरून गेले आहे. अधिकाऱ्यांच्या अटकेमुळे या प्रकरणात अजून मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. पोलिसांचा तपास अधिक खोलवर जात असून, येत्या काळात अजून काही नावं समोर येण्याची चिन्हं दिसत आहेत.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!