महाराष्ट्र

Nagpur : समीर शिंदेंनी झाडांशी जोडले मैत्रीचे बंध

Sameer Shinde : फ्रेंडशिप डे दिवशी ग्रीन वॉरियर बनले शिवसेनेचे शहर प्रमुख

Author

फ्रेंडशिप डे निमित्त शिवसेना नेते समीर शिंदे यांनी नागपूर येथे वृक्षारोपण करून पर्यावरणाशी मैत्रीचा संदेश दिला.

ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार तरुणाईसाठी हा दिवस खास असतो. सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव, रंगीबेरंगी फ्रेंडशिप बँडची देवाण-घेवाण आणि मित्रांमध्ये एकमेकांविषयी असलेलं नातं साजरा करण्याचा उत्साह साऱ्या देशभर उसळतो. ‘फ्रेंडशिप डे’ म्हणजे मैत्रीच्या नात्यांचा सोहळा. पण यंदा नागपूरमध्ये या दिवसाला एक वेगळीच दिशा मिळाली. ती म्हणजे पर्यावरणाशी मैत्री करण्याची. शहरात साजऱ्या झालेल्या फ्रेंडशिप डे निमित्त शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नागपूर शहर प्रमुख समीर शिंदे यांनी एक अभिनव उपक्रम राबवला.

शिंदे यांनी मैत्रीच्या या पवित्र दिवशी वृक्षरोपण करत निसर्गाशी आपले नात घट्ट करण्याचा संदेश दिला. त्यांनी राजकारण बाजूला ठेवत पर्यावरण रक्षणाला प्राधान्य दिले आणि युवकांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण सादर केले. फ्रेंडशिप डेच्या औचित्याने दक्षिण पश्चिम नागपूर मधील मनीष नगर येथे वृक्षरोपणाचा एक भव्य कार्यक्रम पार पडला. या उपक्रमात समीर शिंदे यांच्यासोबत उपशहर प्रमुख कमलाकर सावरकर व बंटी मेंघरे यांनी नेतृत्व घेतले. मित्र म्हणजे विश्वासाचं नातं. पण निसर्गाचे आपल्याशी असलेलं नात हा जीवनाचा श्वास आहे, असं सांगत त्यांनी मित्रासाठी झाड लावा हा संकल्प लोकांसमोर ठेवला.

Nagpur : भाजपच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांनी वाजवली मंडळ यात्रेची तुतारी

शिवसैनिकांचा हिरवा संकल्प

कार्यक्रमात शिवसेनेचे उपशहर प्रमुख राहुल पांडे, सुधीर कोमलकर, प्रवीण कोहाड, रुपेश ठाकरे, श्रीरंग साधू, राजवर्धन वर्मा, सर चेतन पंचलवार, अनुप चौबे, शुभम शर्मा, आदित्य शर्मा, शशिकांत घडयाळजी, पंजाब मुल, राजू कांबळे, सुरेश चौरे, मदन गणवीर, डॉक्टर गवई, अश्विन बनसोड, अमर कांबळे, आनंदकुमार खोरगडे यांच्यासह मनीष नगर येथील महिला संघटना आणि नरेंद्र नगर गार्डन ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यंदाचा फ्रेंडशिप डे केवळ बँड बांधण्यात नाही तर बंध निर्माण करण्यात खर्ची पडला. या उपक्रमातून ‘मैत्री ही निसर्गाशी असावी’ हा विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा समीर शिंदे यांचा प्रयत्न स्पष्टपणे दिसून आला.

समीर शिंदे यांनी स्वतः झाडे लावून लोकांना फोटो नाही, फळे द्या असा सामाजिक संदेश दिला. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले, पर्यावरण हे नुसतेच निसर्गाचे अंग नाही. ते आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाशी जोडलेले आहे. आज एक झाड लावाल, तर उद्या अनेक जीव वाचू शकतात. या उपक्रमाच्या माध्यमातून एक महत्वाची गोष्ट स्पष्ट झाली, मैत्री ही केवळ व्यक्तींशी असतेच असं नाही, तर ती निसर्गाशीही असू शकते. अशा प्रकारचे सामाजिक भान निर्माण करणारे कार्यक्रम ही काळाची गरज आहे.

Prahar Protest : सरकार विसरले आश्वासन अन् आठवले फक्त पोलिस स्टेशन

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!