
चीनमध्ये थैमान घालणाऱ्या एमएमपीव्ही विषाणू सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. टीव्हीवरील भडक बातम्यामुळं देशातील लोक घाबरले आहेत. अशात नागपुरात दोन बालकांना या विषाणूची बाधा झाली आहे. त्यानंतर प्रशासन ‘हाय अलर्ट’वर आहे.
नागपुरातील दोन बालकांना एमएमपीव्ही विषाणू संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं आहे. मात्र यासदंर्भात घाबरण्याचं काहीच कारण नसल्याचं नागपूरचे जिल्हाधिकारी विपीन ईटनकर आणि नागपूर एम्सचे संचालक प्रशांत जोशी यांनी स्पष्ट केलं आहे. गपुरातील खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या दोन रुग्णांना ‘एचएमपीव्ही’ असल्याचे खासगी प्रयोगशाळेतील तपासणीत पुढे आले.
विषाणूची लागण झालेल्या दोन्ही बालकांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं सांगण्यात येत आहे. नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाने आयसीएमआरच्या प्रयोगशाळेत बालकांच्या चाचणीचे नमुने पाठविलं आहेत. प्रशांत जोशी पुढे म्हणाले की, नागपुरात जे संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याची जिनोम सिक्वेंसिंग चाचणी करण्यात येणार आहे. विषाणूच्या जनुकीय बदलाबाबत या चाचणीच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती प्राप्त होऊ शकणार.

फार Tension नाही
‘एचएमपीव्ही’ विषाणू सध्या लहान मुलांमध्ये सर्वाधिक पसरताना दिसत आहे. कोणत्या वयोगटातील लोकांना या विषाणूचा संसर्ग अधिक होऊ शकतो, याची माहिती देण्यात आली आहे. 65 वर्षांवरील वृद्ध आणि लहान मुलांची सर्वाधिक काळजी घेणे आवश्यक आहे. काळजी घेण्याची आवश्यकता असली तरी भीतीचे कोणतेही कारण नाही. विषाणूचे म्युटेशन झाल्याचा कोणताही पुरावा अद्याप आपल्यासमोर आलेला नाही. त्यामुळे लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही, असे माहिती देताना प्रशांत जोशी यांनी सांगितले.
दोन लहान मुलांचा रिपोर्ट एचएमपीव्ही पॉझिटिव्ह आला आहे. नागपुरातील मेडिट्रिना या खासगी रुग्णालयाकडून हे सांगण्यात येत आहे. एका 14 वर्षीय मुलीचा आणि 7 वर्षीय मुलाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या दोन्ही मुलांना खोकला आणि ताप होता. दोन्ही मुलांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडली नाही. दोन्ही मुलं आजारातून बरे झाल्याची माहिती आहे. या रुग्णांचा अहवाल खासगी प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आला होता. मात्र त्यांची पुन्हा एकदा तपासणी एम्समधील आयसीएमआरद्वारा संचालित प्रयोगशाळेत करण्यात येणार आहे. नागपुरात विषाणू आढळला असला तरी त्यामुळं घाबरण्याचं काहीच कारण नाही, असं जिल्हाधिकारी ईटनकर यांनी सांगितलं. या विषाणूसाठी लॉकडाऊन किंवा प्रतिबंध लावण्याची गरज पडणार नाही, असंही सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.