रामगिरी महाराज पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. यावेळी रामगिरी महाराज यांनी राष्ट्रगिताबाबत वक्तव्य केलं आहे.
रामगिरी महाराज यांच्या वक्तव्यावरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. यंदा रामगिररी महाराज यांनी राष्ट्रगिताबद्दल विधान केलं आहे. राष्ट्रगीत जण गण मन नव्हे, तर वंदेमातरम् असायला हवं, अशी मागणी त्यांनी केली. त्यामुळं वाद निर्माण झाला आहे. चलो अयोध्या या चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी ते बोलत होते. 1911 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं राष्ट्रगीत म्हणजे ते इंग्रजांच्या स्तुतीसाठी होतं, असं रामगिरी महाराज म्हणाले. हे गीत देश स्वातंत्र्य झाल्यावर देशाचं राष्ट्रगीत कसं होऊ शकते? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
आपण सत्य मांडलं आहे. या गीताब बत आपण विश्लेषण केलं. यावर अभ्यास केला. सर्वांनी या गिताचा अभ्यास करावा. राष्ट्रगीत प्रबोधन करणारं असावं लागतं. स्तुती करणारं असावं लागतं. रामगिरी महाराज यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसनं त्यांना घेरलं आहे. काँग्रेसचे प्रवक्ता अतुल लोंढे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. आमच्या राष्ट्रीय प्रतिकांचा संबंध आमच्या भावनांशी जोडलेला आहे. त्यामुळे त्याच्याशी खेळू नये, असा जोरदार हल्लाबोल अतुल लोंढे यांनी केला आहे.
Vande Matram गरजेचं
राष्ट्रगिताबद्दल रामगिरी महाराज म्हणाले की, वंदे मातरम् हे राष्ट्रगीत असायला हवं. आपण म्हणत असलेलं राष्ट्रगीत रविंद्रनाथ टागोर यांनी लिहिलं आहे. इंग्रज राजा पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी हे गीत लिहिण्यात आलं होतं. 1911 मध्ये या गिताची रचना करण्यात आली. या गितामध्ये देशाचे भाग्य विधाता राजा पंचम जॉर्ज असल्याची स्तुतीसुमने त्यांनी गायली. अशा गीताला आपलं राष्ट्रगीत मानणं योग्य नाही, असं रामगिरी महाराज यांनी नमूद केलं. रवींद्रनाथ टागोर यांचं शैक्षणिक क्षेत्रात मोठं काम होतं. आपलं काम सुरू व्हावं म्हणून टागोर यांनी इंग्रजांना खुश केलं. त्यासाठी त्यांनी हे गीत तयार केल्याचंही रामगिरी महाराज म्हणाले.
महाराजांच्या या वक्तव्याचा अतुल लोंढे यांनी समाचार घेतला आहे. काँग्रेसकडून रामगिरी महाराज यांच्यावी टीका केली जात आहे. आमच्या राष्ट्रीय प्रतिकांचा संबंध आमच्या भावनांशी जोडलेला आहे. काही लोक आधीपासूनच देशाच्या अस्मितेला धक्का लावत आहेत. देशाच्या संविधानाचा धक्का पोहोचविला जात आहे. राष्ट्रगिताबाबत यापूर्वीच 1919 ते 1936 या काळात खुलासा करण्यात आलेला आहे. रविंद्रनाथ टागोर यांनी सव्यासाची भट्टाचार्य यांना पत्र लिहिले आहेत. या पत्रात टागोरांनी स्पष्टपणं खुलासा केला आहे. राष्ट्रगीत कोणत्याही नेत्यासाठी लिहिण्यात आलं नाही, असं टागोर यांनी नमूद केलं आहे. अधिनायक म्हणजे सर्वशक्तीमान ईश्वर किवा देशातील जनता, असा अर्थ घेतला आहे, अशी माहिती अतुल लोंढे यांनी दिली.
